• Sun. Apr 19th, 2026

नगरसेवकांची संक्रांत तिळगुळा विनाच. वर्ष होत आले कामेच नाहीत!!

Bybaba maske

Jan 15, 2023

नगरसेवकांची संक्रांत तिळगुळा विनाच. वर्ष होत आले कामेच नाहीत!!

 

काँग्रेस नगरसेवकां ची गत तर शेळीच्या शेपटा सारखी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज नगरपंचायत नवीन सत्ता स्थापन करून जवळपास वर्ष होईल पण नगरपंचायत मध्ये निवडून आलेले नगरसेवक तिळगुळच काय साधी साखर सुद्धा नाही.एक वर्षात कुणाच्याच वार्डात काम नसल्याने लोंकाच्या प्रश्नाना उतर देता देता तोंड कडू पडले आहे. पण नगरपंचायत ला कुठला निधी आला आहे ना, कुठल्या वार्डात काम झाले आहे.निवडणुकीत कोरोना काळात व नंतरच्या लाॅकडाऊन मध्ये मतदार संभाळता संभाळता व उरले सुरले निवडणुकीत रिकामे झालेले खिसे एक वर्ष होत आले तरी रिकामेच असल्याने चलबिचल आहे.फक्त गोड गोड बोलुन किती दिवस काढायचे आता असे नगरसेवकात चर्चा आहे.साधे हातपंप दुरुस्त करायला जर पैसे नसतील तर… वार्डात जनतेचा रोष वेगळाच घ्यावा लागत आहे.काँग्रेस नगरसेवक तर आगीतून निघून फुफाट्यात पडल्याची भावना आहे.नावालाच उपनगराध्यक्ष पद पण दोन्ही नगरसेवक उपाशीच.काँग्रेस च्या नगरसेवकांची गत शेळीच्या शेपटा सारखी झाली आहे.काहीच करता येत नाही.त्याच मुळे अजून किती दिवस तोंड कडू रहातेय व कधी एकदाचा तिळगुळाचा लाडू भेटतोय?

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!