केज नगरपंचायत मध्ये अनेक दिवसांपासून ठान मांडलेल्या कर्मचाऱ्याच्यां बदल्या करा,अन्यथा उद्या आमरण उपोषण;पत्रकार साजेद इनामदार.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज नगरपंचायत मध्ये कित्तेक दिवसांपासून ठान मांडून बसलेले वर्ग तीन व चारचे कर्मचारीवर्ग यांच्या तात्काळ बदली करा अन्यथा 20–01-2023 रोजी केज नगरपंचायत समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराच पत्रकार साजेद इनामदार यांनी दिला आहे.नगरपंचायत चा कारभार पाच वर्षानी बदलतो पण कर्मचारीवर्ग बदल होत नाही गेल्या तिन चार वर्षा पासुन तेच ते कर्मचारीवर्ग असल्याने कामे करत नाहीत दुर्लक्ष करतात त्यामुळे कारभारात पारदर्शकता येण्या साठी नगरपंचायत कर्मचारीवर्गाच्या बदल्या करव्यात नाही तर 20/01/2023 तारखे पासून नगरपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल असे मुख्यधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.