• Sun. Jun 21st, 2026

मुख्यधिकारी साहेब उघडा डोळे बघा निट,तुमच्या कार्यकाळात अवैध बांधकामे जोरात!!

Bybaba maske

Jan 20, 2023

मुख्यधिकारी साहेब उघडा डोळे बघा निट,तुमच्या कार्यकाळात अवैध बांधकामे जोरात!!

केज मध्ये नगरपंचायत आहे का नाही व त्याला कोणी चालवत हा संशोधनाचा विषय राहीला आहे

रोखठोक वार्ताहर 

केज नगरपंचायत हद्दीत अवैध बांधकाम करण्याची स्पर्धा लागल्याचे दिसत आहे.सा.बांधकाम विभाग व संबंधित कार्यालयाच्यी जी मोकळी जागा कंपाऊंड वाॅल साठी रिकामी पाच,सहा फुटाची जागा ठेवलेली असते ती जाग विक्री झाली असून त्या जागेवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम होत आहे.त्या पाच, सहा फुटाच्या जागेत पत्र्याचे शेड नव्हे तर तीन तीन मजली बांधकाम चालु आहे.एवढी मर्जी या लोंकान वरती कोणाची असु शकते? या बाबत केज च्या जनतेतून अश्चर्य व्यक्त केले जात आहे.नगरपंचायत चा परवाना घेतात का नाही हा मुद्दा तर आता राहीलाच नाही.मनमर्जीचा प्रकार सध्या केज मध्ये चालु आहे.केज मध्ये नगरपंचायत आहे का नाही हा संशोधनाचा विषय राहीला आहे? असे किती अवैध अतिक्रमण व बांधकामे मोजत बसण्याची वेळ आता केज च्या जनते वर आली आहे.ऐवढीच जनता आता चर्चा करत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!