• Sun. Jun 21st, 2026

मोठ्या राजकीय स्फोटाने केज मतदारसंघ हादरणार?   

Bybaba maske

Jan 21, 2023

मोठ्या राजकीय स्फोटाने केज मतदारसंघ हादरणार?   

रोखठोक न्युज 

केज मतदारसंघात लवकरच राजकीय स्फोट घडण्याची खूप मोठी राजकीय घटना घडणार असल्याचे समजत आहे ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणूक नंतर वरिष्ठाकडून सहकार्य भेटत नाही व नेतृत्व नेहमीच आपल्याला टाळत असल्याच्या भावना अनेकांना सतावत होत्या यातच बाळासाहेबाची शिवसेना हा अनेकांना चांगला पर्याय निर्माण झाल्याने व यामधे अनेकांना वेगवेगळ्या संधी दिसत असल्याने भाजप मधील अनेक तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस मधील अनेक जन आजी माजी पदाधिकारी व आजी माजी लोकप्रतिनिधी या बाळासाहेबाची शिवसेना यामधे प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे .

मागील दोन तीन वर्षात राजकीय क्षेत्रात अनेकांची घालमेल चालू होती पक्षाकडून सहकार्य होत नाही , लोकप्रतिनिधी कामे करत नाहीत व होऊ देत नाहीत , वरिष्ठ खाली वर बोलतात , वरिष्ठ टाळतात , राजकीय समीकरण जूळू देत नाहीत पक्ष , गट सोडून विरोधकाना बळ दिले जाते , परिसरात कामे कसलीच होत नाहीत अश्या अनेक राजकीय समस्या अनेकांना होत्या असे समजते यामुळेच राजकीय घालमेल संपवण्यासाठी दुसरी कडे जायचा पर्याय काही शोधत होते . बीड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉग्रेस या दोनच पक्षाचे राजकीय वजन होते त्यानंतर फक्त बीड मतदारसंघ पुरते शिवसेना होती इतर मतदारसंघ मधे शिवसेनेचे फारसे प्रस्थ नव्हते राष्ट्रीय कॉग्रेस च फक्त अशोक पाटील यांच्या पुरतेच वलय असल्याने जिल्ह्यात अनेकांना राजकीय संधी मिळत नव्हती तर अनेक माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना पाहिजे तशी संधी किंवा मानमरातब शब्दाला किंमत मिळत नसायची अस चित्र होते व भाजप व राष्ट्रवादी कॉग्रेस दोन्ही कडेही हिच परिस्थिती झाली असल्याचे समजते . यातही आमदार नमिता मुंदडा या पहिले राष्ट्रवादी कॉग्रेस व नंतर भाजप असा प्रवास केल्याने  व तसेच अनेक वरिष्ठामुळे यांच्या वर पण अनेकांची नाराजी असल्याचे समजते यातूनच नविन पर्याय अनेक जन शोधत होते शिवसेना फुटून उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची एक शिवसेना व बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) अशी झाल्याने व शिंदे गट भाजप सोबत येत सत्तेवर आल्यामुळे नविन पर्याय निर्माण झाला असून त्यामुळे निर्माण झालेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य , माजी उपसभापती , अनेक ग्राम पंचायत सदस्य , अनेक छोटे छोटे गट , आजी माजी पदाधिकारी , महिला पुरुष हे शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा असून केज विधानसभा मतदारसंघात बाळासाहेबाची शिवसेना शिंदे गटाची मजबुतीकरणाची चर्चा असून मतदारसंघावर पण दावेदारी वाढवणारी असणार असल्याचे समजते .

फेब्रुवारी मधे काही पक्ष प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे अशी चर्चा आहे .

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!