• Fri. Apr 24th, 2026

नायब तहसीलदार महिलेवर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा घटने प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

Bybaba maske

Jan 21, 2023

नायब तहसीलदार महिलेवर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा घटने प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

राज्य महिला आयोगाच्या ॲड. संगिता चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या संगिता तुपसागर-भोसले यांनी केली कठोर कारवाची मागणी

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांचा दोरीने गळा आवळून अंगावर पेट्रोल ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत माहिती अशी की की, शुक्रवार दि. २० जानेवारी रोजी दुपारी २:३० केज तहसीलच्या संजय गांधी विभागाच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड या बीड रोडवरील बीएसएनएल टॉवरच्या पाठीमागील भागातील त्यांच्या निवास्थानी दुपारचे जेवण करून तहसील कार्यालयाकडे जात होत्या. त्या वेळी त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या चार चाकी गाडीतून आलेल्या त्यांच्या भावाची बायको सुरेखा मधुकर वाघ, तिचा भाऊ हरिदास भास्कर महाले आणि तिची आई मुंजाबाई भास्कर महाले आणि एक अनोखी महिला व वाहन चालक यांनी त्यांना रस्त्यात अडवून जळगाव जिल्ह्यातील दोनडिगर येथील जमिनीच्या हक्क सोड पत्रावर सही करण्यासाठी जबरदस्ती केली. तसेच सहा महिन्या पूर्वी केज तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्यावर त्यांचा सख्खा भाऊ मधुकर वाघ याने कोयत्याने जीव घेणा हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता ऱ्या प्रकरणी तो कारागृहात असल्याने त्याची सुटका होण्यासाठी पोलीस केस मागे घेण्याच्या कारणाने त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे त्यानी नायब तहसीलदार आशा वाघ गायकवाड यांचा त्यांच्या घरा समोर दोरीने गळा आवळून अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रसंगावधान राखून आशा वाघ- गायकवाड यांनी आरडा ओरड करून बीड रोडवरील हॉटेल मधूबनच्या दिशेने पळाल्या त्यामुळे हल्लेखोर पळून गेले.
दरम्यान दि. २१ जानेवारी रोजी नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गु र नं २९/२०२३ भा दं वि ३०७ आणि ३४ नुसार जिवे मारण्याचा करणे या आरोपाखाली सुरेखा मधुकर वाघ, हरिदास भास्कर महाले, मुंजाबाई भास्कर महाले एक अनोळखी महिला व पुरुष या पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आंनद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.
ॲड. संगिता चव्हाण आणि संगिता तुपसागर-भोसले यांची केज येथे भेट :- या गंभीर घटनेची राज्य महिला आयोगाच्या राज्य सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या संगिता तुपसागर-भोसले यांनीही सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांची भेट घेऊन पत्राद्वारे यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!