• Fri. Jun 5th, 2026

केज बीड रोडवर मोटार सायकल व कारचा अपघात

Bybaba maske

Jan 22, 2023

केज बीड रोडवर मोटार सायकल व कारचा अपघात

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- केज-बीड रोडवरील पिंपळगाव फाट्या जवळ मोटार सायकल आणि एका कारचा अपघात झाला. अपघातात मोटार सायकल वरील दोघे जखमी झाले आहेत.

रविवार दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५:०० वा. च्या दरम्यान केज-बीड रोडवरील पिंपळगाव फाट्या जवळ मोटार सायकल आणि एका कारचा अपघात झाला. त्या अपघातात मोटार सायकल वरील श्रीहरी गायकवाड आणि प्रभाकर दशरथ गदळे हे दोघे जखमी झाले आहेत.

दरम्यान अपघाता नंतर कार चालक हा भरधाव वेगाने पळून जात होता. परंतु लोकांनी त्या गाडीचा पाठलाग करून धडक देऊन पळून जाणारी कार आणि त्याच्या चालकाला नांदूरफाट्या जवळ ताब्यात घेतले आहे. तर अपघातातील जखमी श्रीहरी गायकवाड आणि प्रभाकर दशरथ गदळे यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून आणून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्रथमोपचार केले. त्या नंतर पुढील उपचारासाठी जखमींना बीड येथे हलविण्यात आले असल्याची माहिती मिळते. तर अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलीस अधिकारी घटना स्थळी पोहोचले आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!