शाॅर्टसर्किट मुळे 5 म्हशी 3 वासरे जळाली तर 20 पोते सोयाबीन व 5 क्विंटल कापूस जळून खाक.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील टाकळी येथील गोविंद वैजनाथ बारगजे यांचा कोट्याला मध्य रात्री आचानक विजेच्या शाॅर्टसर्किट मुळे आग लागली, जनावरांच्या ओरडण्याने बाहेर येवुन बघतातच आगीने रौद्र रूप घेतले होते त्याच वेळेस गलका झाल्याने आजू बाजूचे नागरिक धावून आले व आग विझवण्याचा प्रयत्न केला आग आटोक्यात आली पण कोट्यात ठेवलेले वीस पोते सोयाबीन, पाच क्विंटल कापूस, जळून खाक झाले व पाच म्हसी,तीन वासरे जळाली आहेत.त्यानंतर टाकळीचे ग्रामसेवक शिवकांत मुंडे व राष्ट्रवादीचे युवा नेते यांनी कोट्याची पहाणी केली व शेतकऱ्याला सहानभुती दिली.