केज शहरातील चौकाचे सुशोभिकरन करण्यासाठी केज नगरपंचायत ची उदासीनता..श्री संत भगवान बाबा चौकाचे सुशोभीकरण केले समाजातील युवकांनी.
रोखठोक न्युज
केज शहारातील मुख्य रस्त्यावर अनेक चौक आहेत परंतु आज त्या सर्व चौकाची खुप दयनीय अवस्था झाली आहे केज नगर पंचायत या कडे पुर्ण दुर्लक्ष करते
केज नगर पंचायत निवडनुक होऊन सत्ता स्थापनेला काही दिवसातच एक वर्ष पूर्ण होत आहे
या एक वर्षाच्या काळात मुख्य रस्त्यावरील एका ही चौकाचे काम किंवा सुशोभिकरण केले नाही
यातच आता काही दिवसांवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आली आहे तरी या चौकाची तिचं परिस्थिती आहे
संत भगवान बाबा चौकाची पन खूप दुरावस्था झाली होती परंतु
काही दिवसापूर्वी श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीच्या अगोदर वंजारी समाजातील काही युवकांनी व्हाट्सअप ग्रुप करून श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीच्या अगोदर आपल्याला भगवान बाबा चौकाचे सुशोभीकरण करायचे आहे असा संदेश दिला असता समाजातील काही युवकांनी त्या चौकाचे आपण सर्वजण मिळून सुशोभीकरण करू आणि दोनच दिवसांमध्ये भगवान बाबा चौकाचे समाजाच्या वतीने सुशोभिकरण करण्यात आले
संत भगवान बाबा चौकाचे सुशोभीकरण केले आहे त्याचा आदर्श इतरांनी व केज नगरपंचायतने आवश्य घ्यावा
अशी चर्चा केज तालुक्यातील नागरिक करीत आहेत..
चौकट.
केज नगरपंचायत ला आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन पण भगवान बाबा चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी नगरपंचायत कुठलीच मानसिकता दिसत नव्हती म्हणून आम्ही समाजाच्या वतीने संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त भगवान बाबाच्या चौकाचे सुशोभीकरण केले समाजाचे धन्यवाद.