• Fri. Apr 24th, 2026

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर प्राणघातक हल्ला

Bybaba maske

Feb 9, 2023

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर प्राणघातक हल्ला

रोखठोक न्युज 

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर येथील कसबे धवांडा या गावामध्ये अनोळखी इसमाकडून हल्ला झाल्याची घटना घडली. प्रज्ञा सातव यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. कसबे धवांडा येथे मी दौऱ्यावर होते त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर पाठीमागून हल्ला केला. मला गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न होता. एका महिला आमदारावर हल्ला होणे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. पाठीमागून भ्याड हल्ले करू नका, समोरून येऊ लढा, असे प्रज्ञा सातव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रज्ञा सातव यांनी हल्लेखोर हा अनोळखी व्यक्ती असल्याचे सांगितले. तो व्यक्ती माझ्याजवळ आला होता. कुणीतरी त्याला माझ्याबद्दल माहिती दिली आहे. बॉडीगार्ड माझ्यासोबत उभी होती. त्यावेळी हल्लेखोर मागील बाजूने आला आणि त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भाषण करून गाडीकडे निघत असताना सदरील इसमाने प्रज्ञा सातव यांना पाठीमागे ओढून एक थापड मारल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी त्यांनी कळमनुरी पोलिसात तक्रार केली आहे.

महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहीन. कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता, असे प्रज्ञा सातव यांनी म्हटले आहे. मी काम करू नये, मला मागे ओढण्याचा हा प्रयत्न असू शकतो. मी कधीही मागे हटणार नाही, जनतेची अविरत काम करत राहीन असेही त्यांनी म्हटले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!