• Sun. Jun 21st, 2026

केज तालुक्यात खळबळजनक घटना सुनेच्या भावाने मुलीवर बलात्कार केल्याच्या तणावातून पीडितेच्या आईची आत्महत्या

Bybaba maske

Feb 15, 2023

केज तालुक्यात खळबळजनक घटना सुनेच्या भावाने मुलीवर बलात्कार केल्याच्या तणावातून पीडितेच्या आईची आत्महत्या

रोखठोक न्युज 

 

गौतम बचुटे/केज :- अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या तणावातून पीडितेच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना केज तालुक्यात घडली आहे.

केज तालुक्यातील एका आदिवासी समाजाच्या वस्तीवर बहिणीला भेटायच्या बहाण्याने येत असलेल्या सुनेच्या भावाने मेव्हण्याच्याच अल्पवयीन बहिणीवर घरात कोणी नसल्याची संधी साधून लैंगिक अत्याचार केला. ही घटना पीडितेच्या आईला समजताच तिने मानसिक तणावातून आणि समाजात बदनामी होईल म्हणून दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:०० वा. च्या दरम्यान वस्तीवरील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक महादेव बहिरवाळ आणि पोलीस नाईक शमीम पाशा यांनी घटनास्थळी जाऊन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे घेऊल आले.

दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि त्या बदनामीमुळे पीडित मुलीच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गुन्हा केज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात येत आहे.

पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक सिमाली कोळी या करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!