• Wed. Apr 22nd, 2026

स्विझर्लंड च स्वप्नदाखवून जनविकासआघाडीने केलकेजशहरभकास:एक वर्षाच्या कार्यकाळात एक ही उल्लेखनीय काम नाही!!

Bybaba maske

Feb 15, 2023

स्विझर्लंड च स्वप्नदाखवून जनविकासआघाडीने केलकेजशहरभकास:एक वर्षाच्या कार्यकाळात एक ही उल्लेखनीय काम नाही!!

सत्ताधारी नगसेवका मध्येच चुळबूळ चालू,वार्डात कुठल्या तोंडाने जायचे?

रोखठोक न्युज वार्ताहर 

14 फेब्रुवारी केज नगरपंचायत मध्ये स्थापन करून झाले.पण केज शहरातील एक ही समस्या सत्ताधारी जनविकास परिवर्तन आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आघाडी होऊन सत्ता स्थापन झाली.जनतेच्या आपेक्षा ही खुप वाढल्या होत्या आणि जनविकास परिवर्तन आघाडीच्या नेत्याने केजला स्विझर्लंड करण्याचे स्वप्न दाखवले होते व जनतेने त्यांच्या वर विश्वास ठेवला परंतु गेल्या एक वर्षांपासून फक्त आणि फक्त सत्कार सोहळे व दुकानाचे उद्घाटन या शिवाय यांनी काहीच केल नाही.नगरपंचायत चालवण्या साठी व जनरल अकाऊंट मध्ये मागे एक स्किम राबवली घरकुल मिळेल त्या साठी यांनी नगरपंचायत ची घरपट्टी नळपट्टी भरा तुम्हाला घरकुल मंजूर करतो आणि गरीब नागरीकाची हा कर भरला नगरपंचायत चालाय लागली पण आजतागायत कुणाचेही घरकुल मंजूर झाले नाहीत.जे झाले ते जुनेच यांनी फक्त चेक वाटप चा सोहळा केला. केज शहरामध्ये मोठ्या उत्साहात 1000 महिलांचा मेळावा घेऊन पापड उद्योग ची घोषणा केली उद्योग तर आला नाही 1000 महिला मात्र उद्योगाचे प्रतीक्षा करत आहेत. एक वर्षात नगरपंचायत च्या माध्यमातून एक ही उल्लेखनीय काम दाखवा व बक्षीस मिळवा, असे नागरिकात चर्चेला जात आहे.शंभर दिवसाचा उत्साह साजरी करणारी नगरपंचायत चे सत्ताधारी, नागरिकाच्या एक ही मुलभूत सुविधा देऊ शकल्या नाहीत.आज केज शहरात सर्वात मोठी समस्या महिला शौचालय व जागो जागी मुतारी पाहिजे पण याच्यावर अजून कूठेही काम झाल्याचे दिसून येत नाही.तसेच केज शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा तर भकास शहराच्या विकासाला बसलेली खीळ आहे.पण ज्या दिवसांपासून जनविकास परिवर्तन आघाडीची सत्ता आले त्या दिवसांपासून अतिक्रमण तर काढलच नाहीच, तर बांधकाम परवाने न घेता शहरांमध्ये अनेक बांधकाम चालू आहेत कुठला परवाना नाही..कुठला शहर सिटी आराखडा नाही.केज शहरातील चौकाचे मुद्दे प्रलंबित असल्याने मांजरसुंबा ते धायगुडा पिंपळा रोड चे काम करणारी एचपीएम कंपनी ने केज शहरातील काम रखडवून ठेवले आहे.त्यावर सत्ताधारी आघाडीने शहरात छत्रपती शिवाजीमहाराज चा पुतळा बांधनार म्हणून एक टुम सोडून दिली आहे.शहर अंतर्गत आता पंर्यत एक ही रोड किंवा नाली नवीन बांधली गेली नाही.पाठी मागील वर्षी मार्च महिन्यात म्हणजे आकरा महिन्यात 99 लाख रूपयाच उमरीरोड व वार्ड क्रमांक आठ चे आलेले बजेट पडून आहे त्या वर काहीच काम केले नाही.उमरीरोड साठी लढनारे व सतत पाठपुरावा करणारे हनुमंत भोसले यांना नगरपंचायत समोर घंटानाद अंदोलन करावे लागले तरी या सत्ताधारी मिस घेऊन पडले आहेत, जाग कधी येणार .शेवटी हनुमंत भोसले यांना आमरण उपोषण चा इशारा द्यावा लागला तरीही प्रशासन सुस्त आहे. सत्ताधारी नगसेवका मध्येच चुळबूळ चालू झाली आहे. वार्डात कुठल्या तोंडाने जायचे असे खाजगीत आप आपसात चर्चा करत आहेत.त्यांना केज च्या प्रश्नाचा जिव्हाळा आहे का नाही, हाच प्रश्न केजच्या जनतेतून विचारला जात आहे.आरो फिल्टर सारख शुद्ध पाणी देण्याच दिलेल आश्वासन तर बाजुला राहीले केज शहरात आठ आठ दिवस पाणी नाहीत.विधंन विहीर बंद पडलेल्या अवस्थेत आहेत.हेच का ते!! केजला स्विझर्लंड बनवणारे सत्ताधारी आहेत? आता यानाच टिकीट लावून बघायची वेळ आली आहे असे जनतेत बोलले जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!