केज नगरपंचायत मध्ये कर्मचाऱ्याला मारहाण:मुख्याधिकाऱ्यांचा उंटावरून कारभार.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज नगरपंचायत मध्ये पदभार घेऊन 14 फेब्रुवारीला एक वर्ष झाले.गेल्या दोन दिवसापुर्वी सत्ताधारी गटाच्या नगरसेवकाचे पती नगरपंचायत मध्ये जाऊन येथील माहिती बाहेर का देतोस म्हणून मारहाण केली आहे. याची खात्रीलायक सुत्राकडून माहिती मिळाली आहे.याची कुठेही वाच्यता होऊ नये याची पुरेपुर काळजी सत्ताधारी लोंकानी घेतली आहे पण जर दिवसा ढवळ्या असा हल्ला होत असेल तर केज नगरपंचायत चे सर्व कर्मचारीवर्ग घाबरलेल्या अवस्थेत आहे.केज नगरपंचायत ला सक्षम मुख्यधिकारी नसल्याने त्यांच्या कडे तीन तीन पदभार असल्या कारणाने नगरपंचायत वर त्यांचे कसलेही प्रभुत्व नाही.प्रतेक नागरिक,सत्ताधारी,विरोधक यांना कर्मचारीवर्गानां तोंड द्यावे लागते.मुख्यधिकारी साहेब कधी त्यांना वेळ भेटेल तेंव्हा कधी तरी चक्कर मारतात नाहीतर सगळे काम बीड वरून पहातात.त्यांच्या गैरहजेरीत कर्मचारी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीत.त्यामुळेच वाद वाढत आहेत.तसेच गेल्या एक वर्षांपासून सत्ता येऊन ही कुठलेच काम नाही.वार्डात कुठलेच काम निधी अभावी करू शकत नाहीत,त्यामुळे जनतेत रोष आहे.त्या एका रागातून अश्या घटना घडत आहेत, असे लक्षात येत आहे.असे जनतेत बोलले जात आहे.तरी या पुढे मुख्याधिकारी काय निर्णय घेतात या कडे लक्ष लागले आहे.का प्रकरण राजकीय दबावा खाली मिटत हे पहाण्या सारखे असेल
