वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई यांच्या वतिने उपजिल्हा आधिकारी यांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन
रोखठोक न्युज वार्ताहर
वंचित बहुजन आघाडी आंबेजोगाई च्या वतीने ऊपविभागीय आधिकारी कार्यालय अंबाजोगाई. समोर विविध मागण्यासाठी एक दिवशीय धरणे आंदोलन करन्यात आले.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा अॅड बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मा रेखाताई ठाकुर यांच्या सूचनेवरून मराठवाडा अध्यक्ष मा अशोक हिंगे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील सर्व जिल्हात आणि तालुक्यात सर्व आघाड्यांना सोबत घेऊन आपापल्या तालुक्यातील जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी आज दिनांक २४/२/२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.त्या मध्ये महत्त्वाचे मुद्दे/ विषय खालीलप्रमाणे आहेत.
१)महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कापुस उत्पादन होते आणि शासनाने हमीभाव फक्त ६ हजार रुपये दिल्याने खाजगी व्यापारी सुध्दा ७,८ हजार रुपये क्विंटल दराने कापुस खरेदी करून शेतकर्यांेना लुटत आहे.
त्यामुळे शेतकरी आपल्या मुलांना शिक्षण,मुलांचे लग्न आणि दैनंदिन गरजा पूर्ण होत नसल्याने आत्महत्या करीत आहे तरी शासनाने शेतकर्यां च्या कापसाला १२ हजार रुपये हमीभाव देऊन कापुस स्वत: खरेदी करावा.
२) महाराष्ट्र शासनाने घरगुती वीज बिलाच्या युनिट मध्ये भरमसाठ वाढ न करता इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात भरमसाठ वाढ सर्व सामन्याच्या खिशाला परवडणारी नसून ती संपूर्ण जनतेची दिशाभूल करणारी आहे. वाढवलेली रक्कम जनतेच्या डोक्यावर पडत असल्याने ती अतिरिक्त दरवाढ तात्काळ रद्द करावी.
३) मृत्यूचा सापळा रचनाऱ्या, सामान्य नागरिकांना अरेरावची भाषा करणाऱ्या व अरवाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या, अडमुटे पणाने वागणाऱ्या,उपविभागीय वणअधिकारी व कर्मचारी कस्तुरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
४) बुटेनाथ घाट हा धोकेदायक वळणाचा व अपघाताचा असून तो तीव्र उताराचा आहे.हा घाट बीडच्या पाली घाटा प्रमाणे रस्ता सरळ व खोल करण्यात यावा.
५) बुटेनाथ घाटाच्या रस्त्याची अंदाजपत्रके तात्काळ बनवून रस्त्याचे काम चालू करण्यात यावीत
६) घाटाच्या उत्तरेला रस्त्याच्या बाजूला संरक्षक भिंत बांधन्यात यावी.
७)घाटामध्ये रीप्लेकटर बसवण्यात यावीत.
वरील सर्व मागण्या साठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या वेळेस वंचित बहुजन अधाडीचे जिल्हा अध्यक्ष मा. शैलेश कांबळे, तालुका अध्यक्ष खाजामिया पठाण, शहर अध्यक्ष गोविंद मस्के, जिल्हा उपअध्यक्ष अरुण नाना बनसोडे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सुशांत धावरे, जिल्हा संघटक परमेश्वर जोगदंड,तालुका प्रसिध्दी प्रमुख सतीश सोनवणे, तालुका महासचिव मेघराज कांबळे, शहर महासचिव नितीन सरवदे, शहर प्रवक्ते उमेश शिंदे, युवा जिल्हा महासचिव अक्षय भुंबे,युवा तालुका अध्यक्ष अनिल कांबळे, युवा शहर अध्यक्ष अमोल हतागळे, शहर उपअध्यक्ष सुमित पाचपिंडे, बबन पाचपिंडे, चांद भाई शेख सह इतर सर्व पदाधिकारी होते.