• Fri. Apr 24th, 2026

*कुंबेफळच्या युवा सरपंचाने केली गावातील जिल्हा परिषद आणि खाजगी संस्थे मधील शिक्षकांच्या शाळेच्या वेळेत मोबाईल वर बंधी घालण्याची मागणी…*  

Bybaba maske

Feb 25, 2023

कुंबेफळच्या युवा सरपंचाने केली गावातील जिल्हा परिषद आणि खाजगी संस्थे मधील शिक्षकांच्या शाळेच्या वेळेत मोबाईल वर बंधी घालण्याची मागणी…

शाळेच्या वेळेत शिक्षक सोशल मीडियात व मोबाईल वर बोलण्यात असतात मग्न.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 

केज (प्रतिनिधी) गरिबांच्या मुला मुलीसाठी शासनाने प्रतेक गावा गावात वाडी वस्ती तांडे अश्या प्रतेक ठिकाणी शासनाने जिल्हा परिषद शाळांची उभारणी करून तिथे गलेलठ्ठ पगार देऊन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. आज काल जिल्हा परिषद शाळांची व काही खाजगी शाळांची गुणवत्ता ढासळत जाताना दिसून येत आहे. काही राजकीय शिक्षक आणि तालुक्याच्या लेवलला चमकोगिरी करण्यात मग्न असणाऱ्या शिक्षकांमुळे जिल्हा परिषदेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. तर बरेच शिक्षक हे शाळेची वेळ होऊन आणि तासिका सुरू असताना देखील आपल्या घरच्यांना मित्र कंपनीला तसेच आपल्या काही खाजगी कामानिमित्त मोबाईल वर बोलण्यात तशेच सोशल मीडियाचां वापर करत वॉट्सप, फेसबुक, इंस्टा ग्राम, सह अन्य साधनांमध्ये मग्न असतात मात्र हे सर्व लक्षात घेता कुंबेफळ ग्रामपंचायत चे नवनर्वाचित सरपंच अविनाश पांचाळ उप सरपंच श्रद्धा विष्णु थोरात व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी १५.२.२०२३ च्या मासिक बैठकीत निर्णय घेऊन आता शाळेतील जिल्हा परिषद शाळा व गावात असलेल्या सिध्दी विनायक विद्यालय शाळेच्या मुख्याध्यापकाच्या नावाने ठराव घेऊन त्या ठरावावर आता यापुढे शाळेत असताना व तासीकेवर असताना मोबाईलचा वापर करू नये तशेच शाळेच्या वेळेत मुख्याध्यापकांनी शिषकांची मोबाईल शाळेच्या वेळेत जमा करून घ्यावीत असे असताना देखील मोबाईल वापरताना आडळून आल्यास संबंधितावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असा ठरावच त्यांनी दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापक यांना दिले आहे. व पुढील महितिस्तव जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा शिक्षण अधिकारी. गटशिक्षण अधिकारी. व गटविकास अधिकारी पंचायत समिती केज यांना महितीस्तव सादर करण्यात आले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!