बोंबला!!एका महिन्यात दोनदा पाणीपुरवठ्याची वीज कापली!!शहरातील नागरिक पाण्यासाठी वणवण भंटकती. आमदाराने आणलेल्या निधीचा उत्साह साजरा करण्यासाठी नगरपंचायत सत्ताधाऱ्यांचे प्यादे सरसावले
बोंबला!!एका महिन्यात दोनदा पाणीपुरवठ्याची वीज कापली!!शहरातील नागरिक पाण्यासाठी वणवण भंटकती.
आमदाराने आणलेल्या निधीचा उत्साह साजरा करण्यासाठी नगरपंचायत सत्ताधाऱ्यांचे प्यादे सरसावले
रोखठोक न्युज वार्ताहर
एकाच महिन्यात पाणी वीजबिल थकित प्रकरणात एकाच महिन्यात दोन वेळेस महावितरणने धनेगाव येथून पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्प सोनीजवळा येथील वीज कापली आहे.याच महिन्यात 1 फेब्रुवारी ला नगरपंचायत ने थकित वीजबिल भरणा न केल्या कारणाणे वीज कापली होती,तेव्हा नगरपंचायत ने थोडी फार रक्कम भरून वीज जोडणी केली होती पण लगेच 21 फेब्रुवारीला पुन्हा थकित वीजबिल पोटी सोनीजवळा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची वीज कापल्या मुळे केजकरानां पाण्या साठी वणवण भटकण्याची वेळ एका महिन्यात दोनदा आली आहे.आगोदर केज शहराला पंधरवाडय़ात एकदा पाणी भेटत आणि त्यात हे वीज बिल थकवल्याने महावितरण वीज कापते.आगी तून निघून फुफाट्यात पडल्या सारखी गत आता शहरातील जनतेची झाली आहे. सत्ता येऊन एक वर्ष झाले पण कुठला विकास तर सोडा साध पाणी केजकराच्या नशीबात नाही.मोठ मोठ्या वल्गनां करून आलेल जनविकास परिवर्तन आघाडीच हे सरकार विकास दाखवा हजार रूपय मिळवा अश्या पैंजी आता शहरातील लोक लावत आहेत.विकास थोड्यावेळ बाजुला ठेवा पण पाणी पाजा,’आर वो’ च नव्हे तर साधे तरी पाजा अशी केज ची जनता म्हणत आहे.आजुन तर कडक उन्हाळा बाकी आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर जर ही गत असेल तर पुढचे पाच महिने कसे जातील या चिंतेत केज शहरातील नागरिक आहेत.पण अश्यातच आमदार नमिताताई मुदंडा याच्या पाठपुराव्याने शहर नगरोत्थान योजनेतून 76 कोटी चा निधी आला.अण जसे काय यांनीच निधी आणला या भावात सत्कार सोहळे करण्याचे नियोजन आखले जात आहे.पण गेल्या वर्षभरा पासुन 1कोटी 33 लाखाचा निधी का दडवून ठेवला त्याचे उत्तर वर्षभरात कोणी दिले नाही.