• Wed. Apr 22nd, 2026

*केजच्या संजय गांधी विभागात मोठा आर्थिक घोटाळा असल्याची थेट आपले सरकार पोर्टलवर तक्रार निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे एक आठवड्यात चौकशी करण्याचे आदेश परंतु तीन आठवडे उलटले तरी तक्रार दाराला माहिती दिली नाही*

Bybaba maske

Feb 28, 2023

केजच्या संजय गांधी विभागात मोठा आर्थिक घोटाळा असल्याची थेट आपले सरकार पोर्टलवर तक्रार निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे एक आठवड्यात चौकशी करण्याचे आदेश परंतु तीन आठवडे उलटले तरी तक्रार दाराला माहिती दिली नाही

रोखठोक न्युज वार्ताहर 

 

 केज तहसीलच्या संजय गांधी निराधार विभागा अंतर्गत विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, श्रावणबाळ योजना आणि दुर्धर आजारानेग्रस्त यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक अनुदानात मोठा भ्रष्टाचार असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन चव्हाण यांनी आपले सरकार पोर्टलद्वारे केली होती. त्यात त्यांनी सदर अनुदान हे एकाच व्यतिच्या नावावर बँकेत जमा केले असल्याचा आरोप केला होता. त्याची तात्काळ दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांनी एक आठवड्यात चौकशी करून तक्रारदार सचिन चव्हाण यांना त्याची माहिती देण्याचे आदेश दिले होते. त्या घटनेलाही आता तीन आठवडे उलटून गेले; तरी त्याची तक्रारदाराला माहिती दिली गेलेली नाही. म्हणून तक्रारदार सचिन चव्हाण यांनी आता माहिती अधिकारा अंतर्गत माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील संजय गांधी निराधार विभागातून दिव्यांग, श्रावण बाळ योजना, इंदिरागांधी वृद्धापकाळ योजना, दुर्धर आजारानेग्रस्त आजारी, परित्यक्ता, विधवा यांना सरकारी योजने अंतर्गत दिले जाणारे आर्थिक अनुदान हे बँकेद्वारे वितरित केले जाते मात्र केज तहसिलच्या संजय गांधी निराधार विभागातून हे अनुदान बँकेत वर्ग करताना लाभार्थींची यादीतील बँक खात्यावर न वर्ग करता एकाच खातेदाराच्या खात्यावर जमा केले असल्याने त्यात मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन चव्हाण यांनी दि. २२ जानेवारी २०२३ रोजी आपले सरकार टोकन आय डी क्र. डीआयएसटी/ सीएलबीई/२०२३/ ७०७१ द्वारे केली होती. त्याची जिल्हाधिकारी बीड यांनी दखल घेत निवासी जिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी दि. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी तहसीलदार केज यांना पत्राद्वारे कळवून एक आठवड्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र सदर पत्राला तीन आठवड्यांचा कालावधी उलटून गेला तरी त्यावर केलेल्या चौकशीच्या संदर्भात तक्रारदार आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन चव्हाण यांना कोणतीही माहिती दिली गेली नाही. म्हणून सचिन चव्हाण यांनी दि १३ फेब्रुवारी २०२३ रोजी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत निवासी उजिल्हाधिकारी यांच्या पत्राच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

*चौकट :-*

————————————————

३० लाभार्थ्यांसाठी एकच बँक खाते क्रमांक! :- केज तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांचे अनुदान गेल्या काही महिन्या पासून एकाच बँक खात्यावर जात असल्याची माहिती असून खाते क्र. ८००३ ९ ४६७६६०१ वर्ग झालेल्या खातेदाराचे नाव हे शेख मरियमबी चाँद असे असल्याची चर्चा आहे. आता हे शेख मरियमबी चाँद कोण ?

———————————————-

*केजच्या संजय गांधी विभागात मोठा आर्थिक घोटाळा असल्याची थेट आपले सरकार पोर्टलवर तक्रार निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे एक आठवड्यात चौकशी करण्याचे आदेश परंतु तीन आठवडे उलटले तरी तक्रार दाराला माहिती दिली नाही* एकाच व्यक्तीच्या नावे अनुदान वर्ग करणे ही गंभीर बाब असून तहसील कार्यालया मध्ये रॅकेट सक्रिय असावे. याची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे.”

— सचिन चव्हाण, 

       तक्रारदार 

———————————————

” निराधारांचे अनुदान लाभार्थ्यांच्याच खात्यावर जमा होणे अपेक्षित आहे . लाभार्थ्यांचे अनुदान एकाच बँक खात्यावर जात असल्यास चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल.”

 — दुलाजी मेंढके, 

     तहसीलदार , केज

baba maske

Related Post

कानडी रोडकडे दुर्लक्ष? नागरिकांचा संताप; पुढाऱ्यांवर सवाल यश कन्स्ट्रक्शन कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले?
ऽऽबस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या; आता हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..! “सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलनाची चर्चा जोरात
केज नगरपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सोडल्याचा आरोप. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याला १० दिवस उलटले; अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना नाही. कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!