• Sun. Apr 19th, 2026

सहा वर्षीय चिमुकली वर 60  वर्षीय नराधमाचा आत्याचार 

Bybaba maske

Mar 5, 2023

सहा वर्षीय चिमुकली वर 60  वर्षीय नराधमाचा आत्याचार 

रोखठोक न्युज वार्ताहर 

तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून ६० वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची निंदनीय घटना समोर आली आहे. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्या वृद्धाला पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.

पिडीत अल्पवयीन बालिका सध्या अंबाजोगाई येथील एका शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.०२) शाळेतून गावाकडे घरी आल्यानंतर ती खेळण्यासाठी गेली. त्यानंतर रात्री ती कोणासही काहीही न बोलता एकटीच शांत बसली. त्यामुळे आई-वडिलांनी तिला विचारले असता पोट दुखत असल्याचे तिने सांगितले. दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यानंतरही तिचे पोट दुखत होते. त्यामुळे वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सांगितले की, गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ती मैत्रिणीसोबत खेळत असताना विष्णू बाबुराव सादुळे (वय ६०) हा तिथे आला. चल तुला चॉकलेट देतो असे आमिष दाखवून तो तिला जुन्या घरात घेऊन गेला. तिथे नराधम विष्णूने त्या सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला आणि कोणाला काही सांगितल्यास मारून टाकीन अशी धमकी दिली. सुरुवातीस इभ्रतीच्या भीतीने चिमुकलीच्या मातापित्यांनी कोणालाच काही सांगितले नाही. मात्र, ग्रामस्थांनी धीर दिल्यानंतर त्यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून विष्णू सादुळे याच्यावर पोक्सोसह कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी तत्काळ जेरबंद

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बर्दापूर पोलिसांनी आरोपी विष्णू सादुळे याला तातडीने बेड्या ठोकल्या. सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील तपास पिंक पथक प्रमुख पोलीस उपनिरिक्षक शिंगाडे करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!