• Sun. Apr 19th, 2026

*पंकज कुमावत यांनी बीड शहरातील हॉटेल क्लासिक मधील जुगार अड्ड्यावर धाड*

Bybaba maske

Mar 6, 2023

पंकज कुमावत यांनी बीड शहरातील हॉटेल क्लासिक मधील जुगार अड्ड्यावर धाड

१ लाख ८१ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रोखठोक न्युज 

 

गौतम बचुटे/केज :- गुन्हेगारी जगत आणि अवैद्य धंद्यावर दहशत निर्माण करणारे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी बीड शहरातील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून १ लाख ८१ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या बाबतची माहिती अशी की, जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर धडाकेबाज कारवाया करून अवैद्य धंद्याचे कंबरडे मोडणारे सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की, बीड शहरातील नगर रोड लगतच्या हॉटेल क्लासिक मध्ये प्रवीण राजेंद्र पालवनकर हा त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी जुगार अड्डा चालवीत आहे. अशी माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर त्यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पंकज कुमावत यांचे आदेश मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि आणि त्यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टॉल बाबासाहेब बांगर, राजीव वंजारे, बालाजी दराडे, सचिन अहंकारे, पोलीस नाईक दिलीक गित्ते, महादेव बहीरवाळ, संजय टुले आणि दिलीप जावळे यांच्या पथकाने दि. ५ मार्च रोजी रात्री ९:१५ वा च्या सुमारास हॉटेल क्लासिक च्या दुसऱ्या मजल्यावर धाड टाकली. त्या वेळी हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिर्रट नावाचा जुगार सुरू होता. पोलीस पथकाने त्यांच्या ताब्यातील नगदी १ लाख १३ हजार ४५० रु. आणि ६८ हजाराचे जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ८१ हजार ४५० रु. चा मुद्देमाल जप्त केला.

या धाडीत पोलिसांनी हॉटेल क्लासिकच्या जुगार अड्ड्याचा मालक प्रवीण राजेंद्र पालवणकर याच्यासह वीस जुगाऱ्याना ताब्यात घेऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर यांच्या फिर्याद वरून शिवाजी नगर पोलीस ठाणे बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!