• Wed. Apr 22nd, 2026

बेपत्ता युवकाचा मृतदेह मांजरा पुलावर पाण्यात सापडला आत्महत्या की खून नातेवाकानी व्यक्त केली शंका !         

Bybaba maske

Mar 9, 2023

बेपत्ता युवकाचा मृतदेह मांजरा पुलावर पाण्यात सापडला आत्महत्या की खून नातेवाकानी व्यक्त केली शंका !         

रोखठोक न्युज 

 गौतम बचुटे/केज :- अंबाजोगाई येथील चनई मधून दोन दिवसां पासून बेपत्ता असलेला २७ वर्षीय तरुण पवन रामराव गोचडे याचा मृतदेह कळंब पोलीस ठाणे हद्दीत मांजरा नदीच्या पुलावर पाण्यात आढळून आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, अंबाजोगाई जवळील चनई येथून पवन रामराव गोचडे हा दोन दिवसा पासून बेपत्ता झाला होता. या बाबत त्याच्या नातेवाईकांनी दि. ८ मार्च रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. दरम्यान दि. ९ मार्च रोजी दुपारी ४:०० वा च्या सुमारास मासे धरणाऱ्या लोकांना केज-कळंब रस्त्यावरील मांजरा नदीच्या पुलाजवळ प्रेत तरंगत असताना आढळून आले. कळंब पोलिसांनी सदर प्रेत पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटविण्यासाठी अंबाजोगाई पोलिसांच्या मदतीने बेपत्ता युवकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांना बोलावून घेतले असता हा मृतदेह पवन गोचडे याचा असल्याची ओळख पटली असून सदर मृतदेह हा चनई ता. अंबाजोगाई येथील पवन रामराव गोचडे वय (२७ वर्ष) याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पिंगनवाड, पोलीस नाईक कोळेकर, पोलीस नाईक गायकवाड यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवीला आहे.

सदर बेपत्ता प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुरकुंडे हे तपास करीत आहेत.

————————————————

मयताचा रिक्षा मांजरा पुलावर आढळल्याने पोलिसांना संशय होता :-* चनई ता अंबाजोगाई येथून बेपत्ता असलेला युवक पवन गोचडे याचा रिक्षा दि. ८ मार्च रोजी बेवारस स्थितीत आढळून आला होता.

————————————————

नातेवाईकांना संशय :- * मयत पवन गोचडे याच्या प्रेताची ओळख पटविणाऱ्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून पवनचा घात झाला असावा असा संशय पोलीस अधिकाऱ्याकडे व्यक्त केला आहे.

baba maske

Related Post

ऽऽबस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या; आता हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..! “सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलनाची चर्चा जोरात
केज नगरपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सोडल्याचा आरोप. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याला १० दिवस उलटले; अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना नाही. कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते
केजमध्ये ‘बुद्धंम शरणम् गच्छामि’ संगीतमय महानाट्याचे भव्य आयोजन फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन – भाई मोहन गुंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!