अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांची केज तालुक्यात दोन ठिकाणी अवैद्य दारूवर धाड
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :-
अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या पथकाने केज तालुक्यातील नांदूरघाट आणि सांगवी येथे केज तालुक्यात दोन अवैद्य दारू विक्री व दारू साठ्यावर धाड टाकली.
दि. १० मार्च रोजी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, केज पोलीस स्टेशन अंतर्गत नांदूरघाट येथे एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारूचा साठा करून विक्री करत आहे. त्या वरून अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी त्याच्या पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक सुचिता शिंगाडे व त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार तानाजी तागड, सुरवसे यांनी नांदूरघाट ता. केज येथे कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच दुपारी १:३० वा च्या सुमारास त्यांच्या पथकाने नांदूरघाट येथे छापा टाकला. त्या वेळी भारत रामभाऊ काळुंके हा बेकायदेशीररित्या त्याच्या स्वतःच्या घराच्या बाजूला पत्र्याचे शेड मध्ये दारू विकतना आढळून आला. त्या ठिकाणी पोलिसांनी झडती घेतली आसता त्या ठिकाणी वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवलेली ११ हजार १३० रु. किंमतीची दारू मिळून आली.
तसेच त्या पोलीस पथकाने केज-मांजरसुभा रोडच्या बाजूला सांगवी (सारणी) येथे सोहम हॉटेलच्या बाजूला एक इसम विदेशी दारू विकताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव बन्सी किसन केदार असे सांगितले. त्याच्या ताब्यात २ हजार ३२४ रु. किमतीची विदेशी दारू मिळून आली.
या दोन ठिकाणच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या आदेशाने महिला पोलीस उपनिरक्षक शिंगाडे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत एकूण १३ हजार ४५४ रु. किंमतीची देशी व विदेशी दारू मिळून आली.
पोलीस जमादार रामेश्वर सुरवसे यांच्या फिर्यादीवरून भारत काळुंके व बन्सी केदार यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात महाराष्ट दारूबंदी अधिनियम ६५ (ई) नुसार कारवाई करण्यात आली आहे.