जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी केजची ग्रामसेवक संघटना १४ मार्चपासून बेमुदत संपावर
रोखठोक न्युज वार्ताहर
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी केज येथील ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक संघटना ही १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होणार असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे मार्गदर्शक शिवकांत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक लेखी निवेदन केजचे गटविकास अधिकारी यांना देऊन कळवले आहे.
शासनाने नविन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे व इतर मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी
मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ डी. एन. ई १३२ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी.एन.ई. १३६ व सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी मिळुन १४ मार्च। २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यव्यापी बेमुदत
संपामध्ये केज तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक संघटना ही राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होणार असल्याचे केज ग्रामसेवक संघटनेचे मार्गदर्शक शिवकांत मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली एक लेखी निवेदन तयार करुन दि. १० मार्च रोजी केजचे गटविकास अधिकारी यांना हे लेखी निवेदन देऊन कळवले आहे.