धनेगाव मांजरा प्रकल्प येथे उद्यान उभारावे:नमिताताई मुंदडा यांची मागणी.
रोखठोक न्युज वार्ताहर
धनेगाव (ता. केज, जि. बीड). मांजरा प्रकल्प येथे आद्यकवी श्री, मुकुंदराज स्वामी यांच्या नावाने उद्यानाच्या प्रस्तावास मंजूरी साठी जलसंपदा मंत्री यांच्या कडे पाठवला आहे.पैठण येथील जायकवाडी धरणा लगत संत ज्ञानेश्वर उद्यान आहे त्याच धरतीवर केज तालुक्यातील मांजरा प्रकल्प परिसरात आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्या नावाने उद्यान उभारावे अशी मागणी केज मतदारसंघातील आमदार नमिताताई मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा मंत्री यांच्या कडे केली आहे.सदर उद्याना साठी जमीन ही संपादित करण्यात आली आहे, तसेच सदर धरणाचा परिसर हा केज, अंबाजोगाई, कळंब, तालुक्यातील लोकांसाठी मध्यभागी व जवळ असून हा परिसर निसर्गरम्य आहे. सदर ठिकाणी केज, अंबाजोगाई, कळंब व इतर तालुक्यातील लोकांना, मुलांना, वृद्धाना, या ठिकाणी पर्यटनासाठी येता यावे असे पैठणच्या धर्तीवर या ठिकाणी उद्यान करणे बाबतच्या प्रस्तावाचा त्वरित आराखडा करण्याबाबत आदेश देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी नमिताताई यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्याकडे दिनांक २७/०९/२०२१ रोजी वा त्यासुमारास केली आहे.
सदर उद्यानासाठी नव्याने जमीन संपादित करण्यात आलेली नाही. मांजरा जलाशयाकरीता संपादित जमीनीमध्ये उपलब्ध असलेल्या ३२ हे. क्षेत्रात सदर उद्यान विकसीत करणे प्रस्तावित आहे. सदर धरणाचा परिसर निसर्गरम्य असून केज, अंबाजोगाई, कळंब या तालुक्यांना जवळ आहे.
जिल्हाधिकारी, बीड यांच्या स्तरावरुन मांजरा प्रकल्प, धनेगाव, ता. केज, जि. बीड येथे संपादित केलेल्या ३२ हे. जमीनीवर जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकासासाठी सर्वेक्षण आराखडा तयार करण्याचे निर्देश वरिष्ठ व्यवस्थापक(जलपर्यटन), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांना देण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.