• Wed. Apr 22nd, 2026

केज मतदारसंघातील विकास कामा साठी मिळाला तब्बल 127 कोटीचा निधी.

Bybaba maske

Mar 11, 2023

केज मतदारसंघातील विकास कामा साठी मिळाला तब्बल 127 कोटीचा निधी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने केज मतदार संघावर निधीचा अक्षरशः वर्षाव केला आहे. आ. नमिता मुंदडा यांनी पाठपुरावा केलेल्या अनेक कामांची मागणी मान्य करत केज मतदार संघातील विकासकामांसाठी तब्बल 127 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून अंबाजोगाई आणि केज तालुक्यातील 40 रस्त्यांसह विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.

केज मतदार संघाचा सर्वांगीण विकास नजरेसमोर ठेऊन आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी मागील तीन वर्षात वेळोवेळी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. मंत्रालयात विविध विभागांना भेटी देऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. त्यांची कर्तव्यतत्परता, सततचा पाठपुरावा याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारकडून मागील काही महिन्यात शेकडो कोटींचा निधी केज मतदार संघातील विकास कामांसाठी देण्यात आला. एवढ्यावरच न थांबता आ. मुंदडा यांनी इतर कामांचा पाठपुरावा सुरुच ठेवला. नुकतेच दोन दिवस दिवसांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. यात आ. मुंदडा यांनी केलेल्या अनेक मागण्या मान्य करत केज विधानसभा मतदार संघातील विकास कामांसाठी 126 कोटी 96 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील जवळपास 40 रस्त्यांची आणि विविध शासकीय इमारती उभे करण्याची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये आडस ते सोनवळा, रस्ता सुधारणा करणे – 1 कोटी, दस्तगीरवाडी ते पोखरी रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी, कुंबेफळ ते राडी रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी, चनई ते माकेगाव रस्ता सुधारणा करण- 1 कोटी,अंबावळण ते पोखरी रस्ता सुधारणा करणे-1 कोटी 25 लाख , अंबावळण ते भारज पांदन रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी 25 लाख, रामा- 64 ते कानडीबदन रस्ता सुधारणा करणे -1 कोटी 50 लाख, युसुफवडगाव ते शिंदेवाडी रस्ता सुधारणा करणे- 50 लाख, शिरुघाट ते गदळेवाडी रस्ता सुधारणा करणे-2 कोटी, रामा- 64 ते वरपगाव रस्ता सुधारणा करणे-1 कोटी 75 लाख, जाधवजवळा ते आरणगाव रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी 50 लाख, मांगवडगाव ते लाखा रस्ता सुधारणा करणे- 2 कोटी 75 लाख, जोला ते पिंपळगव्हाण रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी 50 लाख, युसुफवडगाव ते सांवतवस्ती रस्ता सुधारणा करणे- 50 लाख, खरमाटा ते पवारवाडी रस्ता सुधारणा करणे- 50 लाख, दहीफळवडमाउली ते लिंबाचीवाडी रस्ता सुधारणा करणे – 1 कोटी, एकुरका ते धोत्रा रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी, धर्माळा ते प्रजीमा- 39 रस्ता सुधारणा करणे- 75 लाख, एकुरका ते मुंडेवाडी रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी, नारेवाडी ते मुंडेवाडी रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी, चंदनसावरगाव ते उंदरी रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी 50 लाख, प्रजीमा-18 ते रानबाचीवाडी रस्ता सुधारणा करणे – 1 कोटी 50 लाख, जीवाचीवाडी ते तुकुचीवाडी रस्ता सुधारणा करण- 75 लाख, नायगाव ते शिरपुरा रस्ता सुधारणा करणे-25 लाख, भालगाव ते प्रजीमा- 18 रस्ता सुधारणा करणे- 25 लाख, रामा- 209 ते जाधववस्ती (साळेगाव बसस्थानक) रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी, कौडगाव ते सोमनाथबोरगाव र रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी, धारूर- आसरडोह- मोरफळी- राक्षसवाडी- ममदापूर- येल्डा रस्ता सुधारणा करणे- 7 कोटी, आपेगाव- देवळा- अकोला रस्ता सुधारणा करणे- 5 कोटी, येल्डा ते सोनहिवरा (धरोबा मंदिर), रस्ता सुधारणा करणे- 3 कोटी, नांदूरफाटा ते नांदूरघाट रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी 70 लाख, ढाकणवाडी- रामेश्वरवाडी- खाडेवाडी रस्ता सुधारणा करणे- 2 कोटी 50 लाख, सांगवी- एकुरका- माळेवाडी- राजेगाव ते दैठणा रस्ता सुधारणा करणे – 3 कोटी 50 लाख, धनेगाव- नायगाव- सौंदना- ईस्थळ- आपेगाव रस्ता सुधारणा करणे- 2 कोटी 50 लाख, केज- सोनीजवळा- आनंदगाव- पैठण- धनेगाव ते जिल्हा सरहद्द रस्ता सुधारणा करणे- 4 कोटी, कोरडेवाडी- विडा- मस्साजोग- बोरगाव- भोपला रस्त्यावर (काळेगाव घाट जवळ) पुलाचे बांधकाम करणे- 1 कोटी 50 लाख, खर्डा- चौसाळा- साळेगाव- माळेगाव रस्त्यावर (नाव्होली गावा जवळ) लहान पुलाचे बांधकाम करणे- 3 कोटी 50 लाख, प्ररामा- 16 बीड- इमामपूर- नेकनूर- आंबीलवडगाव- पोत्रा- चांदणी- पालसिंगन, रस्ता सुधारणा करणे- 10 कोटी, यशवंतराव चव्हाण चौक ते भगवानबाबा चौक रस्ता- 25 कोटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वा.रा.ती. महाविद्यालय व रुग्णालय ते यशवंतराव चव्हाण चौक रस्ता- 17 कोटी, सा.बा. विभाग, अंबाजोगाई कार्यालय इमारत बांधकाम- 3 कोटी 68 लाख, उप अधीक्षक भूमीअभिलेख, केज. कार्यालय इमारत दुरुस्ती- 34 लाख, सा.बा. उपविभाग, केज. कार्यालय इमारत बांधकाम- 1 कोटी 67 लाख, सा.बा. उपविभाग, केज. येथे शाखा अभियंता निवासस्थान बांधकाम करणे- 1 कोटी 33 लाख, दिवाणी न्यायाधीश (क.स्त), केज यांच्याकरिता निवासस्थानाचे बांधकाम करणे- 3 कोटी 71 लाख, एकूण- 126 कोटी 96 लाख या कामांचा समावेश आहे. वेळोवेळी केलेल्या मागण्यांना सकारात्मम प्रतिसाद देत भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खासदार प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

baba maske

Related Post

ऽऽबस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या; आता हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..! “सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलनाची चर्चा जोरात
केज नगरपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सोडल्याचा आरोप. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याला १० दिवस उलटले; अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना नाही. कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते
केजमध्ये ‘बुद्धंम शरणम् गच्छामि’ संगीतमय महानाट्याचे भव्य आयोजन फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन – भाई मोहन गुंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!