• Wed. Apr 22nd, 2026

*केज येथे व्यसनमुक्ती केंद्र आरोग्य विभागाने केले सील अस्तित्वचे ‘संकल्प’ सील करताच नवजीवनने बोर्ड फाडून गाशा गुंडाळला !*

Bybaba maske

Mar 12, 2023

केज येथे व्यसनमुक्ती केंद्र आरोग्य विभागाने केले सील अस्तित्वचे ‘संकल्प’ सील करताच नवजीवनने बोर्ड फाडून गाशा गुंडाळला !

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- जिल्ह्यात व्यसनमुक्ती केंद्रावर चार ठिकाणी आरोग्य विभागाने छापे घातले. तर केज येथे एका व्यसन मुक्ती केंद्रावर छापा पडला असुन एका व्यसन मुक्ती केंद्रावरचा तर बोर्ड सुद्दा फाडून नवजीवनने पोबारा केला आहे.

दि. ११ मार्च रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या आदेशा वरून केज येथील केज-कळंब रोडवर सुरू असलेल्या सौ. रेखा कुंबेफळकर यांचे अस्तित्व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित संकल्प व्यसनमुक्ती केंद्रावर डॉ. चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक आंनद शिंदे यांच्यासह धाड टाकून तेथील रुग्णांना देण्यात देण्यात येणारी औषधी व रेकॉर्ड्स सील केले. दरम्यान केज येथे बीड रोड लगत नवजीवन व्यसन मुक्ती केंद्र सुरू असल्याची चर्चा आहे. त्या नवजीवनने तर त्यांच्या इमारतीवर लावलेला बोर्ड चक्क फाडून अस्तित्व आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्या बिल्डिंगवरच्या लोखंडी फ्रेमवर अर्धवट फाडलेल्या बोर्डावर “नवजीवन व्यसनमुक्ती रजिस्ट्रेशन नंबर १२१३२/०२ आ…,’ अशी अक्षरे स्पष्ट दिसत आहेत.

या बाबत केज तालुका प्रतिनिधी गौतम बचुटे यांनी संकल्प व्यसन मुक्ती केंद्र सील करणारे आरोग्य पथकातील डॉ. चव्हाण यांचेकडून त्या बाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला; असता डॉ. चव्हाण यांनी सदर माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे यांच्याकडे असल्याचे सांगितले

गौड बंगाल काय ?:- केज येथील सौ रेखा कुंबेफळकर यांच्यव संकल्प व्यसन मुक्ती केंद्रावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या आदेशाने कारवाई होते मात्र नवजीवनचे काय झाले ? अशी चर्चा आहे.

baba maske

Related Post

ऽऽबस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या; आता हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..! “सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलनाची चर्चा जोरात
केज नगरपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सोडल्याचा आरोप. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याला १० दिवस उलटले; अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना नाही. कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते
केजमध्ये ‘बुद्धंम शरणम् गच्छामि’ संगीतमय महानाट्याचे भव्य आयोजन फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन – भाई मोहन गुंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!