वंचित केजची दुर्लक्षित कहाणी!! राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित प्रदेश म्हणजे केज तालुका.
रोखठोक न्युज
तालुका मागासलेलाच राहीला की ठेवला हा मोठा गहन प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना कधीच पडत नाही कारण सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा या अतिशय कमी आहेत कष्टाने आपला चरितार्थ चालवावा व आपल्या कर्तृत्वाने कमवाव व खाव या भावनेचे ९०% नागरिक आहेत तर ५% हे स्वतःला या भुमीचे मायबाप समजून स्वतःच्या भोवतीच फिरणारे व ३% दुसऱ्याच्या सावलीखाली लपणारे २% जागृत आहेत परंतु त्यांची बाजू नेहमीच कमजोर राहते कारण त्यांना ना राजकीय ना सामाजिक ना आर्थिक पाठबळ असत ते आरडाओरडा करतात पण त्याचा उपयोग होत नाही म्हणजे ……… …… फेस न पाणी म्हणल्यासारखी गत आहे .
अस म्हणतात की आपल्या देशात समानता आहे परंतु अजूनही केज तालुक्याच्या नशिबी मात्र मागासलेपणाच आहे कारण ना तर विकासात्मक दृष्टीने याकडे कोणी पाहतच नाही यामुळे केज तालुक्याच्या नुकसानीच होत आल्या आहेत .
यामध्ये प्रामुख्याने नवोदय विद्यालय, पहिले केज तालुक्यात मंजूर झाले होते परंतु राजकीय अनास्थेने ते गेवराईला गेले. तर माढा पुठ्ठा उद्योग सुध्दा केज तालुक्यातच मंजूर झालेली होता १९९० – ९१ साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मंजूर केलेला हा प्रकल्प जिल्हा सोडून पश्चिम महाराष्ट्रात गेला ही वस्तुस्थिती आहे याच बरोबर बबनराव ढाकणे दुग्धविकास मंत्री व बीड जिल्हाचे पालकमंत्री असताना दुग्धप्रक्रीया उद्योग मंजूर झाला होता परंतु दुर्दैवाने प्रकल्प बासनात गुंडाळला गेला . क्रिडा संकुल खूप पुर्वीच झाले होते दुर्दैवानं कधी कुठे कसे गडप झाले कळालेच नाही अश्या अनेक कथानक असतील जी या केज च्या नागरिकांना माहिती पण नसतील, कधी कुठे कसे काय आले अन काय गेले आता तर काय याला ना बुड ना कळस, मग काय सगळं राजकीय आलबेल आहे . केज ला यापुर्वीच औद्योगिक वसाहत , बायपास रोड मंजूर होता अस ऐकिवात होत पण पुढे काय झालं माहिती नाही परंतु हे सगळं कपोलकल्पित नाही हे मात्र खर ..
राजकीय अनास्थेने केज शहरा बरोबरच प्रचंड नुकसान या तालुक्याच्या मातीच केलय अन ते पण राजकीय मंडळीनीच केलय हे पण लक्षात असुद्या . आता थोडीफार जागृती येतेय हे पण खरय मागील २५ वर्षापासून बंद असलेला साखर कारखाना कोणत्या का कारणाने होईना सुरू झाला हे पण बरच झालं. तालुक्यात दुसरा साखर कारखाना जोरात चालतोय हे तर सर्वोत्तम आहे एक सुतगिरणी बंद असताना दुसरी झाली, सध्या जरी बंद असली तरी कशी का होईना सुरू व्हावी हे महत्त्वाचे आहे. उद्योग सुरू व्हावेत शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू व्हायला हवेत तेल उद्योग , दुग्धप्रक्रीया उद्योग सिताफळ प्रक्रिया , ज्वारी गहु प्रक्रिया , शेतमाल उत्पादन वाढावे फळबाग वाढावी व्यवसाय उद्योजक वाढावेत ही येथील राजकीय दृष्टीने अतिशय दुर्लक्षित बाब आहे .
आजही केज तालुक्यात राजकीय दुर्लक्षीत पणा मुळे राजकीय नेते लोकप्रतिनिधी हे एक तर आडवाआडवी जिरवाजिरवी करायला मागेपुढे पहात नाहीत. तर रस्ते ( टक्केवारी साठीची ) नाल्या , सभागृह असल्याच गोष्टी वारंवार करताना दिसतात त्यातही विकास हा कधी दिसतच नाही.प्रत्येक पाच वर्षांत त्याच त्याच रस्त्यावर निधी टाकून ही तो रस्ता कधी पाच वर्ष टिकलाच नाही.गेल्या पंच वार्षिक मध्ये निधी आला कुठे खर्च झाला माहित पडलाच नाही. केज नावाच गाव अजूनही विकासापासून कोसो दुर आहे आणि तसेच भकास आहे.नगरपंचायत झाली थोडाफार बदल जाणवला पण गेल्या आकरा महिन्या पासुन नगरपंचायत आस्तिवात आहे का नाही हेच माहित नाही.लहान पणी ऐकलेली “लांडगा आला रे आला” ची गोष्ट सद्या तंतोतंत लागु पडते जसे “निधी आला रे आला.”निधी काय येईना आणि कुठले विकासाचे कामाची मुहूर्त मेढ काही रोवली जाईना.व्यावसायिकांचा प्रश्न तसाच ठप्प आहे.अतिक्रमणीत जागे मुळे केज शहराचा विकास खुंटला आहे.बेरोजगाराचे लोंढ्यांना काम नाही.मावा,सिगारेट, दारूत पिढी गारद होत आहे.या पापाचे धनी कोणा कोणाला होयचे ते आत्ता लोकप्रतिनिधींनेच ठरवावे.