जुनी पेन्शन योजना लागू करा.. भव्य रॅली, थाळी मोर्चा ने केज शहर दुमदुमले उद्या बीड जिल्हाधिकारी कार्यालया वर भव्य मोर्चा
रोखठोक न्युज केज
केज (प्रतिनिधी ( सन 2005 पासून शासनाने सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी अधिकारी यांच्यावर 18 वर्षापासून जुनी पेन्शन योजना बंद करून भविष्य अंधकारमय केलेले आहे कर्मचाऱ्यांची म्हातारपणातील काठी म्हणजे जुनी पेन्शन होय आणि हीच जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी ही मागणी घेऊन अद्याप पर्यंत विविध धरणे, घंटानाद मोर्चा, काळ्याफिती लावून निदर्शने, लेखणी बंद आंदोलन नागपूर व मुंबई विधानभवनावर लाखोंचे मोर्चे या सर्व संविधानिक मार्गाचा उपयोग करून शासनाकडे आपली मागणी मांडून सुद्धा पोकळ आश्वासनाशिवाय काहीही दिलेली नाही. याउलट आमदार खासदार यांना गरज नसतानाही पेन्शन आहे त्यामुळे सर्व कर्मचारी एकच सवाल करत आहेत *”तेरा भी खून लाल है मेरा भी खून लाल है तुम्ही पुरानी पेन्शन क्यू और हमे एनपीएस का टेन्शन क्यू?”* स्वतःचा संविधानिक हक्क जुनी पेन्शन मिळवण्यासाठी 14 मार्चपासून शासनाला नोटीस देऊन महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचारी बेमुदत संपात उतरले आहेत. या अंतर्गत केज तालुक्यातील विविध विभागातील 3000 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी बेमुदत संपामध्ये सहभागी झाले आहेत 14 मार्चला तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन केल्यानंतर 15 मार्च रोजी जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी घेऊन 1000 कर्मचारी भव्य रॅली एकच मिशन जुनीच पेन्शन, लागू करा लागू करा जुनी पेन्शन लागू करा, अरे कोण म्हणतं देत नाही जुनी पेन्शन घेतल्याशिवाय राहणार नाही अशा विविध घोषणांनी केज शहरातील तहसील कार्यालयापासून ते धारूर चौक, आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालय अशी भव्य रॅली काढून शेवटी तहसील कार्यालय येथे थाळी नाद मोर्चा ने आजच्या आंदोलनाची सांगता झाली. हा मोर्चा आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना अंतर्गत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, तलाठी मंडळ अधिकारी महसूल कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना, कृषी सहाय्यक, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद शिक्षक व खाजगी शिक्षक संघटना, शिक्षक समिती, तालुका भूमि अभिलेख, कोषागार कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, ए आर ऑफिस, नगरपंचायत कर्मचारी संघटना, सार्वजनिक बांधकाम विभाग संघटना, पशुवैद्यकीय, वन विभाग संघटना व इतर अनेक संघटनेच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी बेमुदत संपामध्ये सहभाग नोंदवला यामुळे तालुक्यातील सर्व ऑफिस शंभर टक्के बंद आहेत.. तसेच 16 मार्च रोजी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती
—————————————-
– समन्वय समितीचा गुरुवार दि.१६ मार्च 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा.
—————————————-
जिल्ह्यातील राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद कर्मचाऱ्यांना कळविण्यात येते की, समन्वय समितीच्या वतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाची सुरुवात सकाळी ठीक १०.००वाजता सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथून होईल. बीड शहर पोलीस स्टेशन ,अण्णाभाऊ साठे चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. सर्व कर्मचारी शिक्षकांनी मोर्चा प्रचंड संख्येने सहभागी होऊन जुनी पेन्शनचा लढा यशस्वी करावा असे आवाहन जिल्हा समन्वय समितीच्या वतीने करण्यात येत आहे. बहुसंख्येने उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना व सर्व संघटनेच्या वतीने केले आहे..