• Fri. Apr 24th, 2026

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक्टर चोरांची टोळी पकडली

Bybaba maske

Mar 17, 2023

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक्टर चोरांची टोळी पकडली

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- बीड जिल्हा पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केज तालुक्यातील ट्रॅक्टर चोरांची टोळी पकडली असून त्यांच्याकडून चोरीतील दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहेत.

जिल्ह्यातील विविध भागातून होणाऱ्या ट्रॅक्टर चोरीचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून ट्रॅक्टर चोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 केज तालुक्यातील नांदुरघाट येथील अशोक प्रभू मगरे यांचे २० फेब्रुवारी रोजी रात्री १०:०० वा. च्या सुमारास महिंद्रा अर्जुन कंपनीचे ट्रॅक्टर क्र. (एम एच-४४/डी-६१९३) हे घरा समोर मोकळ्या पटांगणात उभे केलेले ट्रॅक्टर चोरी गेले होते. त्या वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहन आणि ट्रॅक्टर चोरीच्या घटना घडत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक खटावकर यांना मिळालेल्या गुप्त माहिती आधारे पोलीस हवालदार मारोती कांबळे, पोलीस हवालदार जायभाये,

पोलीस नाईक राजू पठाण, अर्जुन यादव वाहन चालक हराळे यांनी दि. १६ मार्च रोजी नांदूरघाट येथून बबन सरदार शिंदे या मुख्य आरोपीसह त्याचे साथीदार शाम उर्फ अनिल बबन शिंदे, (रा. वाशी), अनिल लाला शिंदे आणि सोन्या शहाजी काळे या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता या टोळीने नांदूरघाट येथील अशोक मगरे आणि टेंभुर्णी येथून ट्रॅक्टर चोरले असल्याचे निष्पन्न झाले. त्या नंतर स्थानीक गुन्हे शाखेच्या या पथकाने बार्शी आणि येरमाळ्या जवळील तेरखेडा येथून दोन ट्रॅक्टर व मुद्देमाल ताब्यात घेतला. नांदूरघाट येथील ट्रॅक्टर चोरीचा तपास नांदूरघाट दुरक्षेत्र पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिमान भालेराव हे करीत आहेत.

या टोळीने विदर्भातील वाहन चोरी प्रकरणी यवतमाळ येथील पोलीसही त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता असून स्थानीक गुन्हे शाखेने ट्रॅक्टर चोरांची पकडलेल्या टोळी कडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. हे चारही आरोपी सध्या केज पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!