• Fri. Apr 24th, 2026

पेप्सीचे अमिश दाखवून आठ वर्षाच्या बालीकेवर आत्याचार.

Bybaba maske

Mar 17, 2023

पेप्सीचे अमिश दाखवून आठ वर्षाच्या बालीकेवर आत्याचार.

 

रोखठोक न्युज वार्ताहर 

अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकलीला पाच रुपयांच्या पेप्सीचे आमिष दाखवून ४० वर्षाच्या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. ही संतापजनक घटना पेठबीड भागात गुरुवारी दुपारी घडली. तीन तास मुलगी बेपत्ता राहिल्याने आईने तिचा शोध घेतला. आरोपीच्या दारात मुलीची चप्पल दिसल्यानंतर नागरिकांनी पत्रे काढून घरात प्रवेश केला. यावेळी हा नराधम कुकर्म करताना रंगेहात पकडला. याप्रकरणी पेठबीड पोलिस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलगी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी घरातून बाहेर पडली. याचवेळी गल्लीतीलच एका ४० वर्षाच्या नराधमाची तिच्यावर नजर गेली. त्याने तिच्या हातात पाच रुपये टेकवून तेथीलच एका दुकानातून पेप्सी आणण्यास सांगितले. ही मुलगी पेप्सी घेऊन येताच तिला आपल्या घरात नेत अत्याचार केला. इकडे मुलीची आई तिचा शोध घेत होती. सर्व गल्ली शोधल्यानंतर ती कोठेही न दिसल्याने तिने रडण्यास सुरुवात केली. याचवेळी आईला मुलीची चप्पल या नराधमाच्या घराबाहेर दिसली. तिने दरवाजा’ वाजवला; परंतु कोणीही आतून प्रतिसाद दिला नाही.

आईने आरडाओरडा केला. त्यामुळे गल्लीतील लोक जमा झाले. त्यांनी घराचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला असता हा नराधम नग्नावस्थेत आढळला. मुलगीही घाबरलेल्या अवस्थेत रडताना दिसली. नागरिकांनी त्याला चोप दिला. यात तो जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तो सध्या उपचार घेत असून त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी एक पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!