• Wed. Apr 22nd, 2026

केज तालुक्यातील रोहयो चे ४३० लाख पाण्यात जाण्याची शक्यता.

Bybaba maske

Mar 18, 2023

केज तालुक्यातील रोहयो चे ४३० लाख पाण्यात जाण्याची शक्यता.

रोखठोक न्युज वार्ताहर 

जिल्ह्यात रोहयो साठी २६८२ लाख रुपयाचा निधी आला परंतु सगळी कडे कामे सुरू झाली फक्त केज तालुक्यात काम का बंद आहेत याचे उत्तर मात्र मिळेना खोडा कोणी घातला आहे हे कांही समजेना. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कामे सुरू करावीत अशी मागणी मतदारसंघातील जनता करत आहे केज तालुक्याच्या विकासा साठी आणलेला निधी अडकतो कुठे हेच समजायला मार्ग नाही.आणि का आडवला जातो हे जनतेच्या अकलना पलीकडचे आहे.

बीड जिल्ह्यात ९० ; १० हेड खाली रोहयो विभागाकडून   आष्टी ६१० लाख , केज ४३० लाख , गेवराई १० लाख , धारूर ३१५ लाख , परळी वै २९० लाख , पाटोदा ४९२ लाख , बीड २०० लाख , वडवणी ३० लाख , माजलगाव १२५ लाख , शिरुर का १५५ लाख  अंबाजोगाई २५ लाख असे एकुण २६८२  लाख रुपये मग्रारोहयो साठी आले आहेत २२ सप्टेंबर २०२२ रोजी निघालेल्या या आदेशाची अंमलबजावणी का केली गेली नाही हे एक कोडेच आहे.

केज तालुक्यातील काही गावासाठी ९० ; १० नावाच्या हेड खाली रोहयो विभागा कडून ४३० लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला असताना सप्टेंबर पासून मार्च पर्यतच्या कालावधीत या कामाला चालू करायला  परवानगी का मिळत नाही असा प्रश्न केज तालुक्यातील जनतेला पडला आहे.

या विकास निधीतून जर तालुक्याचा विकास होत असेल व प्रत्येक प्रतिनिधी ने आपले वजन वापरून निधी आणला असेल तर कामे चालु करण्यात काय हरकत आहे.यात पंचायत समितीचा ढिसाळ कारभार तर कारणीभूत नाहीना.केज पंचायत समितीचे अभियंते फक्त गुत्तेदाराच्या बीला वर सही करण्या पुर्तेच पंचायत समितीचे तोंड बघतात त्यांच्या वर कोणाचीच वचक नाही.गेल्या सप्टेंबर पासुन जर निधी अडकला असेल तर गटविकास आधिकार्यांनी ही गोष्ट वरिष्ठ पातळीवर कळवली का नाही हा एक प्रश्न च पडतो.आता या शेवटच्या काही दिवसात निधी वाटप होतो का?विना वापरता वापस जातो हे बघने औचित्याचे ठरेल!!

baba maske

Related Post

कानडी रोडकडे दुर्लक्ष? नागरिकांचा संताप; पुढाऱ्यांवर सवाल यश कन्स्ट्रक्शन कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले?
ऽऽबस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या; आता हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..! “सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलनाची चर्चा जोरात
केज नगरपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सोडल्याचा आरोप. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याला १० दिवस उलटले; अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना नाही. कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!