आजारी असल्याने कामावर येण्यास नकार देणाऱ्या मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना धारूर तालुक्यातील काटेगाव येथे शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी घडली. याप्रकरणी दोघांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
श्रीराम अण्णासाहेब कसबे (वय ४०, रा. सोन्नाथडी, ता. माजलगाव) असे त्या मृत मजुराचे नाव आहे. त्याची पत्नी सीता यांच्या फिर्यादीनुसार, श्रीराम आजारी असल्याने कामावर जाण्यास तयार नव्हता. त्यामुळे अशोक बाबुराव कसबे (रा. सोन्नाथडी) आणि गंगाधर लक्ष्मण तिडके (रा. भोगलवाडी, ता. धारूर) या दोघांनी त्यास जबरदस्तीने ट्रकमध्ये घालून उसतोडणीसाठी नेले. तिथे उसतोडणीचे काम करत नसल्याने व गाडीतून पळून गेल्याच्या रागातून त्या दोघांनी श्रीरामला बेदम मारहाण केली. या मारहाणीत जबर जखमी झाल्याने श्रीरामचा मृत्यू झाला. सदर फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर धारूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.