• Sun. Jun 21st, 2026

केज तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट,गहु ज्वारी,हरभरा,टरबूजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान व्हिडिओ लिंक आत मध्ये.

Bybaba maske

Mar 18, 2023

केज तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट,गहु ज्वारी,हरभरा,टरबूजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

 

रोखठोक न्युज वार्ताहर 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली असल्याने गहू, हरबरा, आंबा यासह फळभाज्या, भाजीपाला आणि टरबूज यांचे नुकसान झाले आहे.

 

दि. १८ मार्च रोजी दुपारी केज तालुक्यातील केज, मस्साजोग, काळेगाव, नांदूरघाट, पिंप्री, हदगाव, डोका, सातेफळ, माळेगाव, कोरेगाव, कोठी, सांगवी, सारणी, गोटेगाव, मोटेगाव, होळ, चंदनसावरगाव, चिंचोली माळी, युसुफवडगाव, विडा, आडस, येवता, लव्हुरी, कानडी, येथे पाऊस व गारपीट झाली. गारासह पडलेल्या अवकाळी पावसाने गहू, हरबरा, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे तसेच आंबा आणि फळभाज्या, भाजीपाला व टरबूज आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!