• Sun. Jun 21st, 2026

19 नगरसेवक माझ्या सोबत,शेवटी भ्रमाचा भोपळा फुटला!!स्टँडींग कमिटीच्या मिंटीग वर काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस च्या सभापतीचा बहिष्कार

Bybaba maske

Mar 31, 2023

19 नगरसेवक माझ्या सोबत,शेवटी भ्रमाचा भोपळा फुटला!!स्टँडींग कमिटीच्या मिंटीग वर काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस च्या सभापतीचा बहिष्कार

रोखठोक न्युज वार्ताहर 

29 मार्च ला मोठा सोहळा करून पाच कोटी निधीचे लोकार्पण सोहळा धाटामाटात पार पडल्या नंतर पहिला धक्का आघाडीत असणाऱ्या काँग्रेस ने कार्यक्रमाकडे पाठ फिरवून दिला.त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस ने पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमा बद्दल नाराजी व्यक्त केली.त्या नंतर आज दि 31 मार्च रोजी नगराध्यक्ष ने नगरपंचायत कार्यालयात सर्व सभापतीची म्हणजेच स्टँडींग कमिटीची मिंटीग ठेवली होती. त्या मध्ये पाच कोटी रूपय तसेच 500 लक्ष रुपये निधीचे झालेले टेंडर ची मान्यता स्टॅंडिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये घ्यायची होती स्टॅंडिंग कमिटीची मीटिंगच झाली नसल्यामुळे होणाऱ्या पाचशे लक्ष निधीच्या कामाला आता ब्रेक लागला आहे काही निधी तसेच काही निर्णय स्टँडींग कमिटीच्या मिंटीग मध्ये प्रस्तावित होते. त्या साठी नगराध्यक्षांनी नगरपंचायत मध्ये मिंटीग बोलावली होती पण आजच्या सुद्धा मिंटीग वर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस च्या सभापतींनी बहिष्कार टाकला.त्यामुळे नगराध्यक्षाला मिंटीग रद्द करून पुढची तारीख द्यावी लागली.डिग्यां पिटण्यात परिपूर्ण असलेली जनविकास परिवर्तन आघाडी लगातार दोन पावले पिछाडीवर आली.जेंव्हा पासुन नगरपंचायत मध्ये सत्ते भध्ये आल्या पासुन सर्व पक्षीय सत्ता असल्याच दाखवणारे जनविकास चे सर्वासर्वे वर ही वेळ का आली? याचे परिक्षण करण्याची वेळ त्यांच्या वर आल्याची परिस्थिती आता निर्माण झाली  असल्याची दिसून येत आहे.असे विरोधी नगरसेवकांत बोलले जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!