• Sun. Jun 21st, 2026

दारू पाज म्हणून दारुड्याने एकाचे डोके फोडले.

Bybaba maske

Apr 2, 2023

दारू पाज म्हणून दारुड्याने एकाचे डोके फोडले.

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- दारू प्यायला पैसे का देत नाहीस म्हणून केज तालुक्यातील मस्साजोग येथे एका दारू पिलेल्या इसमाने एकाचे डोके फोडले आहे.

या बाबतची माहीती अशी की, दि. २७ मार्च रोजी मच्छिंद्र पांडुरंग सोनवणे रा. मस्साजोग हे साखर काखान्या वरून ऊस तोडणी संपवून गावी आले असता कुशल अश्रुबा धिवार हा त्याला तू मला दारू आज म्हणाला. त्यावर मच्छिंद्र सोनवणे हा त्याला म्हणाला की, “मी ऊस तोडुन आलो आहे. माझ्याकडे पैसे नाहीत.” असे म्हणाल्या नंतर कुशल धिवार त्याला म्हणाला की, “तुझ्याकडे बघतो.” असे म्हणुन निघुन गेला.

दि. ३१ मार्च रोजी सकाळी १०:०० वा. सुमारास मस्साजोग येथे बस स्टँडवर कुशल आश्रुबा धिवार याने दारु पिऊन मच्छिंद्र सोनवणे यास त्याने दारु का पाजीत नाहीस; असे म्हणुन हातातील दगड मच्छिंद्र सोनवणे याच्या डोक्यात पाठीमागुन डोक्यात मारुन डोके फोडले.

या प्रकरणी मच्छिंद्र सोनवणे याच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात कुशल धिवार याच्या विरुद्ध गु. र. नं. १९२/२०२३ भा. दं. वि. ३२४, ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक दिलीप गित्ते हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!