• Tue. May 26th, 2026

ज्या जिल्हाधिकारी मोहदयाने वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला ते जिल्हाधिकारी वनक्षेत्र वाढीसाठी विशेष लक्ष देतील का. सामाजिक वनीकरण व वनविभाग फक्त कागद काळे करायलाच का? जिल्ह्यामध्ये सामाजीक वनीकरण व वनविभागाचे शुन्य काम

Bybaba maske

Apr 3, 2023

ज्या जिल्हाधिकारी मोहदयाने वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला ते जिल्हाधिकारी वनक्षेत्र वाढीसाठी विशेष लक्ष देतील का.

सामाजिक वनीकरण व वनविभाग फक्त कागद काळे करायलाच का?

जिल्ह्यामध्ये सामाजीक वनीकरण व वनविभागाचे शुन्य काम

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड जिल्हा व केज तालुका हा दुष्काळी भाग म्हणून सर्वत्र परिचित आहे, त्याचे कारणही तसेच आहे. जिल्ह्यात फक्त २.४० टक्के वनक्षेत्र असल्याने जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. हेच वनक्षेत्र वाढविण्यासाठी सामाजिक वनक्षेत्र विभाग व वनविभागाने विशेष पुढाकार घेऊन येथील वनक्षेत्र वाढविण्यासाठी काम करण्याची गरज होती परंतु गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक वनीकरण विभाग व वनविभाग विशेष असे कार्य करताना दिसत नाही. मग हे दोन विभाग फक्त कागद काळे करण्यापुरतेच आहेत का असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील व तालुक्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच आता याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

सामाजिक वनीकरण विभाग व वनविभाग या दोन्ही विभागाला गिते व केज तालुक्याला शेवाळे नामक अधिकारी आहेत. हे अधिकारी फक्त खुर्चीला भार असल्यासारखेच दिसत आहेत. गिते यांच्या कार्यकाळात दोन्ही विभागात विशेष असे कार्य आजपर्यंत तरी दिसून आले नाही. मग गिते व केज तालुक्यातील शेवाळे हे फक्त मार्चएन्डचे काळे कागद करण्यासाठी आले आहेत का? का खरेच त्यांना जिल्ह्यातील तालुक्यातील वनक्षेत्र वाढीसाठी काम करायचे आहे तसे असेल तर त्यांचे काम का दिसत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक वनीकरण विभाग व वनविभाग जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी विशेष कार्य करताना दिसत नाहीत. वनक्षेत्रा वाढीबाबत जिल्ह्यात एवढी गंभीर समस्या निर्माण असताना सुद्धा गित्ते अधिकारी शांत का? वृक्ष लागवड तर नाहीच परंतु वृक्षतोडीवर सुद्धा या अधिकाऱ्यांचे कंट्रोल नाही, यामागे नेमके दडलय काय ? का आर्थिक व्यवहार होत आहे, याठिकाणी जवळपास शंभर सॉमील कोणाच्या आशीर्वादाने चालतात, जिल्ह्यात न खुलेआम वृक्षतोड होतेय यावर हे अधिकारी कारवाई का करत नाहीत यासह इतर प्रश्न याठिकाणी उपस्थित होऊ लागले आहेत. जिल्ह्याच्या ा भवितव्यासाठी या समस्याकडे राजकीय नेत्यांनी व नागरिकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.ज्या जिल्हाधिकारी मोहदय वृक्षा ला राखी बांधून रक्षाबंधन साजरा करतात त्या संवेदनशील जिल्हाधिकारी मोहदया कढून अपेक्षा वाढल्या आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!