• Fri. Sep 11th, 2026

व्वा आडसकर साहेब!! हमालांच्या हक्काची जागाही आपल्याच कार्यकर्त्याला दिली.

Bybaba maske

Apr 5, 2023

व्वा आडसकर साहेब!! हमालांच्या हक्काची जागाही आपल्याच कार्यकर्त्याला दिली.

रोखठोक न्युज 

केज बाजार समितीची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे.बाजार समिती आपल्याच ताब्यात ठेवण्या साठी केज मतदारसंघातील दिग्गज नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे.भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गट पडल्याचे दिसून येत आहे तर शिंदे यांच्या शिवसेना ही नशीब अजमावून पहात आहे.अश्यातच हमाल माथाडी साठी राखीव एक जागा आडसकर गट्टातुन आपल्या कार्यकर्त्याला बिनविरोध निवडून आणले आहे.लोकशाहित सर्वांना आप आपले हक्क दिलेले असताना नेते मात्र या हक्का पासुन सर्वसामान्य माणसाला दुर ठेवून घटनेची पायमल्ली करतात.हमाल माथाडी साठी कृषी उत्पन्न बाजार समितीत एक जागा राखीव असते त्या जागेवर प्रतिनीधी म्हणून त्या प्रवर्गातील माणूस निवडून आला पाहीजे. पण तिथे आपला कार्यकर्ता निवडून आणला आहे.विडा येथील रहिवासी व ग्रामपंचायत सदस्य अंकुश कलानी यांना हमाल माथाडी प्रवर्गातून बिनविरोध निवड झाली आहे.महाराष्ट्राचे माजी विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांचा वाद असाच न्यायालयात चालू आहे.बघू आता केज कृषी उत्पन्न बाजार समितीत यावर कोणी हरकत घेतय का?

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!