देवगांव येथील रेणूका माता यात्रा महोत्सवा निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील देवगांव येथील रेणुका माता यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही बुधवार पासून सुरु होत आहे.दि.५ एप्रिल बुधवार रोजी सुवासिनी जेवणाचा कार्यक्रम तर ६ एप्रिल गुरुवारी सकाळी रेणुका मातेचा गाढा ओढणे,पालखी मिरवणुक व सांयकाळी देवी मंदीर परीसरात सांकृतीक मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आलेले आहे असे रेणुका माता संस्थानचे अध्यक्ष रमाकांत मुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
केज तालुक्यातील देवगांव येथे गावाच्या उत्तर दिशेला दोन कि.मी.
अंतरावर तिर्थक्षेत्र रेणुका माता मंदिर आहे.पंचक्रोशीतील भाविकांचे ग्रामदैवत असलेल्या रेणुका मातेची यात्रा चैत्र महीन्यातील पौर्णीमेच्या दिवशी दरवर्षी भरते दर वर्षीप्रमाणे याही वर्षीही
रेणुका माता यात्रा महोत्सव बुधवार पासून सुरु होत आहे.दि.५ एप्रिल बुधवार रोजी सुवासिनी जेवणाचा कार्यक्रम तर दि.६ एप्रिल गुरूवार रोजी सकाळी आठ वाजता रेणुका मातेचा गाढा गावातील हनुमान मंदिरापासून वाजत गाजत मंदीराकडे निघेल व त्याच दिवशी रेणुका मातेची पालखी गावातुन वाजत गाजत निघते हा पालखी सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशील मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होतात. रेणुका देवीची पालखी मंदीर परीसरात आल्यावर बाहेर गावाहून आलेल्या प्रमुख यात्रेकरु पाहुण्यांचा यात्रा कमिटी व गावक-यांच्या वतीने सत्कार चहा व पानसुपारीचा कार्यक्रम होईल व सांयकाळी आठ वाजता रेणुका देवी मंदीर परीसरात सुप्रसिद्ध नादखुळा हा सिनेतारकांचा मराठी लावण्याचा बहारदार कार्यक्रम होईल व शुक्रवारी सांयकाळी आठ वाजता चंदनसावरगाव येथील सुप्रसिद्ध आराधी गायक नागेश तागडे महाराज यांच्या लोकप्रिय देवीगीतांचा कार्यक्रम होणार आहे.तिस-या दिवशी शनिवार रोजी दुपारी पाच वाजता रेणुका देवी मंदीर परीसरात महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल.सांयकांळी आठ वाजता गावात देवीचा छबिना (पालखी) मिरवणूक होईल अशा विविध कार्यक्रमाने रेणुका मातेची यात्रा संपन्न होणार आहे असे रेणुका माता संस्थानचे अध्यक्ष रमाकांत मुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
चौकट..
काही महिन्यांपूर्वीच गावात ग्रामपंचायत निवडणुक झाली असल्याने यावर्षी रेणुका माता यात्रेत कुस्त्यावरुन तक्रारी होतील या धास्तीने या वर्षी कुस्त्यांचा कार्यक्रम रद्द केला आहे.