• Mon. Jun 22nd, 2026

केज येथील प्रभाग क्रमांक 02 व 13 मध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे नसता तिव्र आंदोलन करण्याचा इशारा – महिला काँग्रेस अध्यक्ष कविता कराड.

Bybaba maske

Apr 6, 2023

केज येथील प्रभाग क्रमांक 02 व 13 मध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे नसता तिव्र आंदोलन करण्याचा इशारा – महिला काँग्रेस अध्यक्ष कविता कराड.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज दि.6 , येथील प्रभाग क्रमांक 02 व प्रभाग क्रमांक 13 मधिल बारभाई गल्ली, सबस्टेशन एरिया, ईस्लामपुरा मोहल्ला, शिवाजी नगर, माधव नगर, सारस्वत कॉलनी, धारुर रोड परिसरातील दोन्ही बाजु तसेच अंबाजोगाई रोड वरिल दोन्ही बाजु जुनी दुध डेअरी मागिल परिसर, पेट्रोल पंपा समोरिल परिसर थोरात हॉस्पिटल जवळील एरिया, इस्माईल बाग मोहल्ला इत्यादी भागात केज नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी बोर (इंधन विहीरच) पाण्याचा वापर करत आहे. या पाण्यामुळे या भागातील नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. किडनी स्टोन सारख्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. उन्हाळ्यात सर्वांचेच बोर चालु रहात नसल्याने या भागातील नागरिकांना अंबाजोगाई रोड वरिल व धारुर रोड वरिल प्रेशर वाल वरिल पाण्याचा वापर करावा लागत अस्याने हे दोन्ही ठिकाणचे वाल अत्यंत धोकादायक आहे. हे दोन्ही मार्ग राष्ट्रीय महामार्ग असल्याने या ठिकाणाहून पाण्यासाठी जिव मुठीत घेऊन पाणी आणावे लागते.हा राष्ट्रीय महामार्गावर वेगवान वाहतूक असल्याने आपघात होण्याचा धोका आहे. तरी मुख्याधिकारी नगरपंचायत यांना दिलेल्या निवेदनात या भागातुन केज शहराला पाणी पुरवठा करणारी धनेगांव येथुन आलेल्या पिण्याच्या पाण्याची फिल्टर टाकी असुन याच फिल्टर टाकीतुन शहरातील विविध भागाला पाणी पुरवठा करण्यात येतो या जलवाहिनी तुन या भागात नविन पिण्याच्या पाण्याची टाकी करून या भागाला या उन्हाळ्यात पाणी पुरवठा करावा नसता तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला निवेदनावर महिला काँग्रेस अध्यक्ष प्रा डॉ सौ कविता कराड, मजहर शेख,विलास नेहरकर, शेख शफिक, शेख नय्युम, राऊत शारदा,नेहरकर नितीन यांनी दिला

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!