• Sat. Apr 18th, 2026

केज तालुका गारपीटानी झोडपला: फळबाग सह भाजीपाल्याचे मोठे नुकसान

Bybaba maske

Apr 8, 2023

केज तालुका गारपीटानी झोडपला: फळबाग सह भाजीपाल्याचे मोठे नुकसान

देवगाव, मांगवडगाव, हंगेवाडी येथे विज पडून जनावरे दगावले तर अनेक ठिकाणी घरांची पडझड आणि झाडे पडली

रोखठोक न्युज वार्ताहर 

तालुक्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, काही ठिकाणी पावसाची भुरभुर आली परंतु माळेगाव ( ता.केज ) येथे दुपारी जोरदार पाऊस व गारपीट झाले. गारपीटीने फळबाग व भाजीपाल्याचे मोठं नुकसान झालं आहे.

मागील मार्च महिन्यात बीड जिल्ह्यासह केज तालुक्याला अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपून काढले आहे. यानंतर पुन्हा अवकाळीचे ढग आले. वेध शाळे कडून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त केला. अंदाजानुसार आज शनिवार ( दि. ८ ) सकाळपासून ढगाळ वातावरण असून, बीड, गेवराई, वडवणी आदि भागात दुपारपर्यंत पाऊस झाला. केज तालुक्यातील माळेगाव, बोरगाव भोपला,सुर्डी चिंचोली माळी, सारुकवाडी, सुर्डी, सोनेसांगवी, विडा, शिरुर आणि परिसरात जोरदार गाराही पडल्या. केज शहरातही रिमझिम पाऊस पडला. वातावरण बदल झाल्याने अगोदरच पिकांवर रोगराई पडली असून आता गारा पडल्याने फळबागांसाह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान यावर्षी हवामान वेगळेच दिसत असून दिवसभर कडक ऊन अन रात्री गारवा असे वातावरण अनुभवयास मिळाले असून त्यात आता पावसाची अन गारांची भर पडली आहे. परिसरात दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान तासभर वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस व मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. तसेच देवगाव येथे वीज कोसळून बैल दगावल्याचे वृत्त आहे. गारांचा आकारही बोरा पेक्षा जास्त मोठा असल्याचे सांगितले जात असून, मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने गारांचा खच पडला होता. या गारपीटीने टरबुज, खरबूज, अंबे आदि फळबागांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. यासह आदि पिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळी संकट कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गारपीटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी केली जात आहे.

केज तालुक्यात तीन ठिकाणी वीज पडून पाच जनावरे दगावले :हंगेवाडी येथे वीज पडून शशिकांत संपत हांगे यांचा बैल आणि जयराम तुकाराम हांगे एक बैल एक गाय ही तीन जनावरे मृत्युमुखी पडले. तर देवगाव येथे वीज पडून नारायण मुंडे बैल दगावला आणि मांगवडगाव येथेह वीज पडून दत्तू मुळूक गाय दगावली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!