श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन, इंग्लिश स्कूल अँड सुपर अबॅकस अकॅडमीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.
याविषयी सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन व इंग्लिश स्कूल अँड सुपर अबॅकस अकादमीच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्टेज करेज निर्माण व्हावे व थोर पुरुषांचे विचार आचरणात आणण्यासाठी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ इंग्लिश स्कूल चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. गोविंद नाना शिनगारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केज शहर वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष तथा रोखठोकचे संंपादक मा. बाबासाहेब मस्के, संघर्ष पत्रकार संघाचे सचिव मा. श्रीराम तांदळे, ह.भ.प आबा महाराज मेहरकर, माजी सरपंच सुनील बापू देशमुख, जेष्ठ नागरिक चंद्रकांत भुजबळ, प्रमोद नखाते सर हे होते.
यावेळी बोलताना गोविंद नाना शिनगारे, ह.भ.प. आबा महाराज मेहरकर, व बाबासाहेब मस्के, यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरीत्रावर गौरवोद्गार काढले.
तर श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन, इंग्लिश स्कूल व सुपर अबॅकस च्या विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरीत्रावर वक्तृत्व केले.
यामध्ये लहान गटातुन मयुर बालासाहेब नखाते, प्रथम तर आराध्या अविनाश नखाते द्वितीय क्रमांक पटकावला व मोठ्या गटातुन कैवल्य ज्ञानेश्वर लिमन प्रथम, तर जयराज दत्ता कांबळे, द्वितीय व ज्ञानदा विवेक दळवे तृतीय तर प्रणव प्रकाश गलांडे याने चौथा क्रमांक पटकावला.
यावेळी शालेय विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संस्कार इंग्लिश स्कूल च्या शिक्षीका सौ. सीमा काळे मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन, इंग्लिश स्कूल अँड सुपर अबॅकस अकॅडमी चे संचालक अनिल गलांडे यांनी केले.

