• Fri. Jun 5th, 2026

मल्टिस्टेटची शाखा उघडलीच नाही आणि ठेवीदारांची पळापळ.केज मधेही सुळसुळाट कोणावर विश्वास ठेवावा? बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिसेटस बँक पळाली.

Bybaba maske

Apr 15, 2023

मल्टिस्टेटची शाखा उघडलीच नाही आणि ठेवीदारांची पळापळ.केज मधेही सुळसुळाट कोणावर विश्वास ठेवावा?

बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिसेटस बँक पळाली.

रोखठोक न्युज केज 

 भरमसाट व्याज दराचे आमिष दाखवून कोट्यवधींच्या ठेवी जमविल्यानंतर मागच्या काही दिवसात बीडमधील जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटमध्ये ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यामध्ये अडचणी येत होत्या. मल्टीस्टेटने दिलेले काही धनादेश देखील बाउंस झाले आणि त्यातच शनिवारी मल्टिस्टेटची शाखा देखील उघडलेच नाही. त्यामुळे जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटच्या ठेवीदारांची पळापळ सुरु झाली असून काही ठेवीदारांनी पोलिसांकडेही धाव घेतली आहे. दरम्यान मल्टिस्टेच्या वतीने शाखेच्या बाहेर ‘सर्वांचे पैसे मिळतील, कोणी अफवांना बळी पडू नये’ असा फलक लावला असला तरी ज्यांच्याकडे पाहून ठेवी दिल्या तेच नॉट रिचेबल झाल्याने ठेवीदार मात्र अस्वस्थ झाले आहेत.अश्याच प्रकारे केज मध्ये ही मल्टिस्टेट शाखेचा चा धुमाकूळ माजला आहे.जिकडे बघावे तिकडे सगळे पेव फुटल्याचे जाणवत आहे.अश्या वेळी कोणत्या मल्टिस्टेट शाखेवर भरोसा ठेवावा कारण सर्वच शाखेत मोठ्या व्याज दराच अमिश ग्राहकाला दाखवण्यात येत आहे.मध्यंतरी केज मध्ये बर्‍याच मल्टिस्टेट शाखा ग्राहकाला चुना लावून गाशा गुंडाळून गेले आहेत.पण जास्त अमिशाला ग्राहक भुलतात व बळी पडतात याचाच मल्टिस्टेट शाखे वाले व त्याचे अध्यक्ष,चेअरमनच्या प्रतिष्ठित असल्याने ग्राहक त्यांच्यावर विश्वास ठेवतात व तेथेच त्यांची फसवणूक होते.जीवनभराची आपली कमाई अश्या डोळ्या देखत बुडल्यावर ग्राहक सैरभैर होतात.तर कांही जण आत्महत्ये सारख पाऊल उचलतात.त्या मुळेच शासनाने यांच्या वर कडक कारवाई करावी असे ग्राहक म्हणत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!