• Sun. Apr 19th, 2026

तीन दिवस झाली लाईट नाही.ताबंवा गावात महावितरण चे आधिकारी महिलाने कोंडले.

Bybaba maske

Apr 15, 2023

तीन दिवस झाली लाईट नाही.ताबंवा गावात महावितरण चे आधिकारी महिलाने कोंडले.

 

रोखठोक न्युज वार्ताहर 

 केज तालुक्यातील तांबवा येथे मागील तीन दिवसांपासून लाईट नसल्यामुळे महिलांनी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले आहे.सविस्तर वृत्तांत असा की गेल्या तीन दिवसा पुर्वी पाऊस पडला.व तालुक्यात लाईट गेली आहे.ती अध्याप पंर्यत दुरुस्त झाली नाही.केज शहरात आकरा डिपी बंद आहेत तर कांही खेडे गाव गेल्या तीन दिवसांपासून अंधारात आहेत.याचे कोणत्याच अधिकाऱ्यांना सोयरसुतक नाही.अधिकारी मुख्यालयी न रहाता बाहेर गावाहून ये जा करतात.फोन तर हमेशा बंद असल्या कारणाणे संपर्क होत नाही.पाठी मागील काळात 10 MVA चा डिपी फेल झाला म्हणून भोपाळ येथे दुरुस्त करण्यास पाठवला त्या काळात ही एक महिना शहर व काही खेडेगावात आंधार होता कसा तरी डिपी दुरुस्त केला तर तो दुरुस्तच झाला नाही अशी आवई अधिकार्‍यानी उठवली सत्य परिस्थीती अशी होती की त्या डिपीचा एक बटण दाबायचे होते. तो डिपी चालुच होता.ऐवढे तज्ञ लोंकाचा भरणा केज महावितरण कार्यालयात आहे.गेल्या चार दिवसांपासून आंधारात असलेल्या गावातुन आज तांबवा गावातील महिलानी महावितरण चे आधिकारीच कोंडून ठेवले.कारण घरात पाणी,पिठ कांहीच नाही.जोपर्यंत विज पूर्ववत करत नाहीत तोपर्यंत अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्यात येईल असे या आक्रमक महिलावर्गाने रोखठोक शी बोलताना सांगीतले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!