• Sat. Apr 18th, 2026

अबब तीन दिवसात तीन खून:तीन खूनाने जिल्हा हादरला.

Bybaba maske

Apr 14, 2023

अबब तीन दिवसात तीन खून:तीन खूनाने जिल्हा हादरला.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तीन दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी खुनाच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अद्याप यातील दोन प्रकरणात आरोपी अटक नाहीत.सलग तीन दिवसात तीन मर्डर झाल्याने बीडचा पुन्हा बिहार होतोय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुरुवारी मोबाईल चोरीची तक्रार दिल्याच्या रागातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. तरुणाची हत्या करणारे त्याचेच मित्र असल्याचे तपास उघड झाले आहे. हे दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.बिंदुसरा धरणाच्या जवळ अक्षय नावाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.त्याने मोबाईल चोरीची तक्रार दिल्याने त्याचा मित्रांनीच खून केल्याचे समोर आले आहे.

दुसऱ्या एका घटनेत कुक्कडगाव येथील गणेश आठवले यांच्या शेतातील विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला. अज्ञात व्यक्तीने या महिलेची गळा चिरुन हत्या केली असावी त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीमध्ये फेकला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या महिलेचे वय साधारण 30 ते 32 वर्षांदरम्यान असावे. पिंपळनेर पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.मुंडके नसलेला मृतदेह आढळून आल्याने मृत महिला कोण आहे आणि मारेकरी कोण आहेत याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

या दोन घटनेच्या धक्यातून बीडकर सावरतात न सावरतात तोच तिसरी घटना शुक्रवारी आष्टी तालुक्यात समोर आली आहे.झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात सिमेंट बाॅल्क मारून पतीने खून केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास आष्टी शहरातील फुलेनगर येथे घडली आहे.निलम संभाजी वाल्हेकर वय(३२)वर्ष असे मयत पत्नीचे नाव आहे.आरोपी पती संभाजी वाल्हेकर याला अटक करण्यात आली आहे.

आष्टी येथील फुलेनगर येथे राहत असलेल्या संभाजी वाल्हेकर हे पत्नीसह नेहमीप्रमाणे जेवण करून गुरूवारी रात्री अंगणात झोपले होते.शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास पत्नी झोपेत असताना दारूचे व्यसन असलेल्या पतीने तिच्या डोक्यात सिमेंट बाॅल्क मारून खून केल्याची घटना घडली.या प्रकरणी आरोपीचा भाऊ दौलत वाल्हेकर याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात आरोपी पती संभाजी शिवाजी वाल्हेकर वय वर्ष ३८ रा.फुलेनगर आष्टी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!