• Mon. Apr 27th, 2026

जनाबाई बचुटे यांचे वृद्धापकाळाने निधन ; पत्रकार गौतम बचुटे यांचा सांभाळ कलेले मातृत्व हरवले.

Bybaba maske

Apr 18, 2023

जनाबाई बचुटे यांचे वृद्धापकाळाने निधन ; पत्रकार गौतम बचुटे यांचा सांभाळ कलेले मातृत्व हरवले.

रोखठोक न्युज 

जनाबाई शहाजी बचुटे वय वर्षे ८५ रा. साळेगाव यांचे काल दि. १७ वार सोमवार रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. 

जनाबाई बचुटे या जुन्या पिढीतील एक कष्टकरी, मेहनती आणि प्रामाणिक महीला म्हणून संपूर्ण गावात परिचित होत्या. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांबरोबरच लहान पणीच आई विना पोरके झालेले आपले दोन पुतण्यांचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करून चांगले संस्कार व शिक्षण देत सर्व मुले सुशिक्षित केले आहेत. त्यांच्या मेहनती मुळे सर्व सामान्य कुटुंब नौकरीदार कुटुंब बनले आहे. 

त्यांच्या पश्चात मुलगा रावसाहेब शहाजी बचूटे माजी सैनिक, अंनत शहाजी बचुटे शेती, गौतम बचुटे पत्रकार, बलभीम बचुटे वाहक, नातू डॉ. आकाश बचुटे, विद्याभुषण, डॉ. विवेक, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

त्यांच्या निधनाने बचुटे परिवारावर दुख्खाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व साळेगाव येथील नागरीकांनी हळहळ व्यक्त केली आहे. तसेच तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरिक, राजकीय नेतेमंडळी व पत्रकार यांनी बचुटे कुटुंबाच्या दुखाःत सहभागी असल्याच्या भावना व्यक्त केली आहे.

या माझ्या चुलती होत्या आणि आईचा मला व भावाला चेहरा आठवू शकत नसताना आणि आई कशी होती ही कल्पना करीत नसताना तिने आम्हाला मोलमजुरी करून शिकविले व सांभाळले. आम्ही दोघे पुतणे ( गौतम व बलभीम) आणि तिची दोन मुले (रावसाहेब व अनंत) असलो तरी ती सर्वाना माझी चार मुले म्हणूनच सांगत होती. गावातील अनेकांना माहीत नाही की ती माझी चुलती होती म्हणून खऱ्या अर्थाने ती आमची आईच होती. असे म्हणत पत्रकार गौतम बचुटेना  भावना आवरता आल्या नाहीत. गौतम बचुटे यांच्या दुखाःत रोखठोक परिवार सामील आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!