न.प.चा लाचखोर कार्यालयीन अधीक्षक पकडला
रोखठोक न्युज वार्ताहर
शासनाचा पगार घेवून पुन्हा शेन खाणार्या अधिकार्यांची संख्या वाढत आहे. अंबाजोगाईमध्ये घराची पीटीआरवर नोंद करण्यासाठी दोन हजाराची लाच स्विकारतांना अंबाजोगाई न.प.चा लाचखोर कार्यालयीन अधीक्षक आत्माराम जीवनराव चव्हाण (रा. अंबाजोगाई) याला बीड एसीबीने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली.
तक्रारदार यांच्या वडिलाचे नावे असलेले वडिलोपार्जित घराची मालकी हक्क वडिलांनी सोडून दिल्यामुळे तक्रारदा यांना मालकी हक्कात वडिलांचे नाव कमी करुन स्वत:चे नाव नोंदणी करायची होती. यासाठी आरोपीने 6 हजाराची लाच मागितली होती. तडजोडीअंती दोन हजार स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई बीड एसीबीचे शंकर शिंदे, पोलिस अंमलदार हनुमान गोरे, संतोष राठोड, अमोल खरसाडे, गणेश मेहेत्रे यांनी केली.
