संभाजी ठोंबरे यांचे अल्पशा आजाराने निधन
रोखठोक न्युज
केज दि.२३(प्रतिनिधी) तालुक्यातील उंदरी येथील रहिवाशी असलेले व गावच्या सेवा सहकारी सोसायटी चे सलग ३० वर्षे चेअरमन असलेले संभाजी सुंदरराव ठोंबरे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्यावर दि.२२ रोजी दुपारी ५ च्या दरम्यान उंदरी येथे त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संभाजी ठोंबरे यांना आण्णा व चेअरमन या टोपण नावाने या भागात ओळखले जायचे उंदरी गावच्या व तालुक्याच्या राजकारणात त्यांचा मोठा सहभाग कायम असायचा ते स्व.बाबुराव आडसकर यांचे अतिशय निकटवर्तीय होते पुढे त्यांनी स्व. मेघराज आडसकर व सद्या रमेश आडसकर यांच्या सोबत काम केले. आडसकर घराण्यावर जीवापाड श्रद्धा असनाऱ्या काही निवडक पैकी संभाजी ठोंबरे हे होते. याचा फायदा म्हणून गावातील अनेकांना त्यांनी आडसकर यांच्या शिक्षण संस्थेत नोकऱ्या मिळवून दिल्या. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करन्यात येत असून त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
