• Wed. Apr 29th, 2026

काउंटरवर बिअर पिऊ नको म्हणताच दारुड्याने वेटरला बदडले !दारुड्याने केली वेटरला मारहाण : ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Bybaba maske

Apr 23, 2023

काउंटरवर बिअर पिऊ नको म्हणताच दारुड्याने वेटरला बदडले !दारुड्याने केली वेटरला मारहाण : ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

रोखठोक न्युज

गौतम बचुटे/केज :- बिअर बारमध्ये एका दारुड्याने वेटरला मारहाण केल्या प्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २० एप्रिल रोजी धनेगाव ता. केज येथील धनेगाव कॅम्पवर मनोज बिअर बारमध्ये कृष्णा तुकाराम कोल्हे याने बिअर खरेदी केली आणि तो काउंटर समोरच ती पिऊ लागला; म्हणून तेथील वेटर रमेश बाळु काळे वय (२४ वर्षे) हा त्याला म्हणाला की, समोरच्या टेबलवर बसून प्या. येथे पिऊ नका. असे म्हणताच दारुड्या कृष्णा कोल्हे याने रमेश काळे याला जातीवाचक शिवीगाळ करून काठीने मारहाण केली.

रमेश काळे यांच्या फिर्यादी वरून कृष्णा कोल्हे याच्या विरुद्ध केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. ७५/२०२३ भा. दं. वि. ३२३, ३२४ ५०४ आणि ॲट्रॉसिटीचे कलम ३ (१) (आर) ३ (२) (व्हीए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!