• Tue. May 26th, 2026

प्रा.किशोर दळवे यांना ” बेस्ट रिसर्च स्कॉलर अवॉर्ड ” प्रदान झाल्यानिमित्ताने सत्कार

Bybaba maske

Apr 22, 2023

प्रा.किशोर दळवे यांना ” बेस्ट रिसर्च स्कॉलर अवॉर्ड ” प्रदान झाल्यानिमित्ताने सत्कार

रोखठोक न्युज वार्ताहर 

प्रा.किशोर दळवे यांना २९ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान एस जी टी युनिव्हर्सिटी,गुरुग्राम (हरियाणा) येथे झालेली ३री आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स : इनोव्हेटिव्ह अप्रोचेस ईन ऍग्रीकल्चर, होर्टिकल्चर अँड अलाईड सायन्सेस -२०२३ मध्ये *”बेस्ट रिसर्च स्कॉलर अवॉर्ड”* हा अवार्ड प्रदान करण्यात आला. सदरील अवॉर्ड हा सर्व क्षेत्रातील संशोधनात उत्कृष्ट काम करणाऱ्या निवडक संशोधकास दिला जातो. प्रा.किशोर दळवे यांना पीएचडी अंतर्गत संशोधन करत असतानाच “मॅनेजमेंट सिस्टिम्स ईन ऍग्रो टुरिझम” या विषयातील त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. याकरिता त्यांनी आतापर्यंत पब्लिश केलेले गुणवत्तापुर्ण रिसर्च पेपर, स्वतः जमा केलेला प्रायमरी डेटा,कृषी पर्यटन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी स्वतः मांडलेल्या संकल्पना,स्वतः पार्टीसिपेट केलेल्या कॉन्फरन्सेस व सध्या संशोधनात देत असलेले योगदान ईत्यादी गोष्टी पुरस्कारासाठी पाहण्यात आल्या. त्यांनी गांधी महाविद्यालय, कडा येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रास भेट दिली तेंव्हा अभ्यासकेंद्राचे केंद्रप्रमुख तथा प्राचार्य नंदकुमार राठी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मधील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी अभ्यासकेंद्राचे केंद्रसंयोजक डॉ.अशोक कोरडे, डॉ.सुनील पंढरे, संगणक तंत्रज्ञ श्री ज्ञानेश्वर खंदारे व ईतर सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.त्यांच्या या यशाबद्दल दगडूभाऊ दळवे, आशाआक्का दळवे, प्रा.दया पाटील, बाबुराव दळवे(ना. तहसीलदार), संतोष हुरगट (कृषी अधिकारी), पत्रकार महादेव दळवे यांनी अभिनंदन केले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!