• Sun. Apr 19th, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयात विक्रमी 32 शस्त्रक्रिया एकाच दिवसात

Bybaba maske

Apr 27, 2023

केज उपजिल्हा रुग्णालयात विक्रमी 32 शस्त्रक्रिया एकाच दिवसात.

रोखठोक न्युज केज

सविस्तर वृत्तांत असा की उपजिल्हा रुग्णालय केज येथे दिनांक 26/4/2023 रोजी वार बुधवार, एकाच दिवसात वेगवेगळ्या एकुण विक्रमी 32 शस्त्रक्रिया झाल्या.यात वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय राऊत यांच्या मार्गदर्शनात, स्त्रीरोग तज्ञ डाॅ.केशव इंगोले यांनी 2 सिझेरियन शस्त्रक्रिया,10 कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया,3 गर्भपात तर नेत्ररोगतज्ज्ञ डाॅ.आळणे यांनी 10 मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. तर सर्जन डाॅ.सदाशिव राऊत यानी 5 सर्जरी त्यात 5 हर्णीया व अंपेडिक्स चा समावेश आहे.तर अस्थिरोगतज्ज्ञ डाॅ.विशाल करपे यांनी दोन हाडाचे ऑपरेशन केले.या साठी भुलतज्ञ म्हणून डाॅ.बालासाहेब साळुंके,डाॅ.दिगांबर मुंडे यांनी सहकार्य केले तर ऑपरेशन थिएटर मध्ये असिस्टंट म्हणून स्टाफ नर्स ज्योती आरकडे,महादेव इंगळे,शितल पंतगे.तर चतुर्थ कर्मचारीवर्गा मध्ये नासेर सय्यद,परमेश्वर राऊत,विजय महाजन यांनी सहकार्य केले त्यामुळे एक दिवसात विक्रमी शस्त्रक्रिया केल्या नंतर सर्व जनाचे अभिनंदन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संजय राऊत यांनी केले आहे.तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारीवर्गातून कौतुक केले जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!