विहीर / कुपनलिका पुनर्भरण करण्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांचे आवाहन
यासाठी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत
रोखठोक न्युज वार्ताहर
सद्यस्थितीत बंगालच्या उपसागरात अल निनो समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहता सर्व जिल्ह्यांनी नियोजन करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले असून त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये पडणान्या पावसाचे नियोजन करून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे पिकाकरिता उपलब्ध संरक्षित सिंचन सुविधेच्या अस्तित्वातील विहीर अथवा कुपनलिका यांचे पाण्याची उपलब्धता तसेच भूजलपातळी वाढण्याच्या दृष्टीने विहीर व कुपनलिका पुनर्भरण करणे आवश्यक आहे त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ लाभ घेऊन यातून शेतकन्यांकडे उपलब्ध विहार अथवा कुपनलिका अधिकारी यांचे पुनर्भरण करण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी च्या जिल्हास्तरीय बैठकीत सूचित केले आहे. योजनेचा लाभ अकुशल भाग रु. २७३ प्रतिदिन मजुरी, ४० मनुष्य दिनाचे एकूण रुपये १० हजार ९२० कुशल व साहित्य खर्च रु. ६ हजार ८८४ – आवश्यक कागदपत्रे जॉब कार्ड, ग्रामसभेचा ठराव, ७/१२ उतारा (विहीर / कुपनलिका नोंद असलेला), नमुना ८ अ उतारा, इतर योजनेतून लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, यासाठी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत. यामुळे येणाऱ्या हंगामात पडणान्या पावसाचे पुनर्भरण करणे शक्य होईल व यातून भुजल पातळी वाढल्याने सिंचन क्षमता वाढ होण्यास मदत होईल. तसेच संभाव्य पाणीटंचाईवर मात करता येईल. याकरिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे
