भाजपच्या प्रदेश चिटणीस पदी प्रा.किरण पाटील.तर सदस्य पदी रमेश आडसकर..
प्रा. किरण पाटील व रमेशराव आडसकर यांच्यावर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी
रोखठोक न्युज वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढलेले प्रा.किरण पाटील व माजलगाव मतदार संघातून निवडणूक लढलेले रमेशराव आडसकर यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवत मराठवाड्यातील प्रमुख चार पदाधिकाऱ्यांमध्ये प्रा. किरण पाटील यांची वर्णी लावली असून त्यांचेवर आता पक्षाने प्रदेश चिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे तर रमेशराव आडसकर यांना महाराष्ट्र सदस्य पदी निवड केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रा.किरण पाटील यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाने जाहीर केलेल्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती मध्ये मराठवाड्यातून चार जणांना प्रदेश कार्यकारणी मध्ये चिटणीस पदावर संधी देण्यात आली. यामध्ये किरण पाटील यांची वर्णी लागल्याने संभाजीनगरसह सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.तर रमेशराव आडसकर यांच्या निवडीने बीड जिल्या सहित केज व माजलगाव गाव मतदार संघात आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
पक्षाने दिलेली जबाबदरी चोख पार पाडणार – प्रा.किरण पाटील
पक्षाने माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला मोठी संधी दिली आहे. यापूर्वी देखील मला संभाजीनगर शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी पक्षाने व पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आणि आज मला पक्षाच्या महत्वपूर्ण असलेल्या कार्यकारणी मध्ये प्रदेश चिटणीस पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास व जबाबदारी मी पुढील काळात चोखपणे पार पाडेल असा विश्वास प्रा.किरण पाटील यांनी व्यक्त केला.
